फार छान दिसणं म्हणजे तितकंच सुख असेल अस नसत. कधी कधी समाजाला जरी एखादा व्यक्ती गर्भश्रीमंत वाटत असला तरी ज्याचा त्याचा संघर्ष ज्याला त्यालाच माहीत असतो. खूप ही गोष्ट एखाद्या कलाकारा बद्दल घडते. प्रसिध्दी वरून परिस्थतीची तोलमोल कलाकारांना बाबत बरेचदा केली जाते. पण दिसत तस नसत हे सांगणारी अभिनेत्री विशाखा सुभेदारची पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसते.(Vishakha Subhedar America)
सध्या विशाखाचा कुर्रर नाटकाचा प्रयोग अमेरिकेत सुरू आहे. विशाखासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पंढरीनाथ कांबळे हे कलाकार देखील अमेरिकेत आहेत. पण तिथे प्रयोग करणं दिसतय तेवढं सोप्प नाही म्हणत costume इस्त्री करतानाचा एक फोटो विशाखा ने पोस्ट केला आहे आणि कॅपशन मध्ये ‘Show साठी गेलोय… अनेक काम स्वतः च करावी लागतात… इस्त्री, सेट, प्रॉपर्टी, lights, music, सगळे सगळे स्वतःच.. आम्ही सगळेच ह्या जबाबदाऱ्या पेलावतोय.. Thank team.. कुर्रर्रर्रर्र प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे, शशी केरकर, महेश सुभेदार..! थोडं दमतोय, झोपेचं खोबरं होतंय.. पण परदेशातील आपल्या माणसंची कौतुकाची थाप खुप समाधान मिळवून देते… आणि शेवटच्या फोटोमध्ये दार show ला थकलेले आम्ही पुन्हा एकदा सज्ज होतो पुढल्या प्रवासाला…’ अस लिहिेलं आहे. अमेरिका प्रयोग करताना झालेली ही धावपळ विशाखा ने प्रेक्षकांसमोर मांडली आहे.(Vishakha Subhedar America)
हे देखील वाचा –“आम्ही दोघी जोडीच्या जोडीच्या”,निवेदिता सराफ यांच्या बहिणीला तुम्ही पाहिलंत का?

अनेक विनोदी भूमिका साकारल्यानंतर आणि हास्यजत्रेसारख्या विनोदी रियालिटी कार्यक्रमात काम केल्या नंतर, काही तरी वेगळी भूमिका साकारावी असे विशाखाला वाटल्यामुळे तिने “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कार्यक्रमातून निरोप घेतला. सध्या विशाखा “शुभविवाह” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ती सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शुभविवाह ही मालिका प्रसिद्धी मिळवत असून कार्यक्रमातील सगळीचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली दिसत आहेत. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढू लागली आहे.