मालिका विश्वात अनेक मालिका सध्या आघाडीवर आहेत २, ३ वर्ष एखादी मालिका अजून त्याच सुरात चालू आहेत. अनेक नव नविन वळणं कथानकात आल्यामुळे प्रेक्षकांना ची मालिका पाहण्याची उत्सुकता किंचित ही कमी होताना दिसत नाही.(Jaydeep Concern About Laxmi)
स्टार प्रवाह वाहिनी वरील अनेक मालिका सध्या चर्चेत आहेत, प्रेक्षकांच्या फार जवळ आहेत. त्या मालिकांमधील एक मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असत. या मालिकेतील जयदीप गौरीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या जोडी सोबतच मालिकेतील इतर पात्रांवर देखील प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.
मालिकेत या जोडी मध्ये लक्ष्मी ची म्हणजेच जयदीप गौरीच्या मुलीची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. आणि त्या पाठोपाठ जयदीप ची आणि मंगलची सुध्दा मालिकेत एन्ट्री झाली. नुकताच समोर आलेल्या प्रोमोत लक्ष्मी सर्व परिवारा सोबत एक गेम खेळताना दिसते या गेम मध्ये ठरलेल्या नियमानुसार लक्ष्मी म्हणते जो हरणार तो ‘ भुसनाळ्या ‘ लक्ष्मी च्या तोंडून ही भाषा ऐकून जयदीपचा राग अनावर झालेला दिसतो. रागावून तो लक्ष्मी ला विचारतो कोणी शिकवलं तुला हे सगळं तेव्हा लक्ष्मी मंगल आजीच नाव सांगते.तर आता लक्ष्मी वर चांगले संस्कार होण्यासाठी जयदीप गौरी कोणता निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.
हे देखील वाचा –“आम्ही दोघी जोडीच्या जोडीच्या”,निवेदिता सराफ यांच्या बहिणीला तुम्ही पाहिलंत का?
विशेष म्हणजे मालिकेतील नायकांसोबतच खलनायक सुद्धा चांगलेच चर्चेत आहेत आधी शालिनी आणि आता मंगल ही २ पात्र मिळून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. तर सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेतील जयदीप गौरीला देखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसतंय.(Jaydeep Concern About Laxmi)