स्टार प्रवाहवरील शुभविवाह या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं.या मालिकेत सध्या भूमी आकाशची लग्नसराई पाहायला मिळतेय. या मालिकेत सर्वच पात्रांना चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळतंय. तर या मालिकेतील अभिनेत्री विशाखा मालिकेत एक नकारात्मक पात्र साकारताना दिसतेय.विशाखा ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते.ती काही सेटवरील देखील बीट्स व्हिडीओ शेअर करते, अश्यातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. (Vishaka Subhedar)
विशाखाने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. हा व्हिडीओ नाईट शूटिंगचा असुन यात विशाखासोबत विजय पटवर्धन देखील पाहायला मिळतायत. या व्हिडिओत त्यांचा पॅकअप झाल्याचा आनंद दिसून येतोय, पण त्यांच्या या व्हिडिओत त्यांच्या डायरेक्टरची अवस्था पाहून सगळ्यांना व इतर कलाकारांना हसू आवरत नसल्याचं दिसतंय.
हे देखील वाचा: अमेरिकेच्या कानात वाजणार कुर्रर्रर्रर्र…..
या व्हिडिओला विशाखाने “Night शिफ्ट.. पॅकअप हा शब्द ऐकायला आतुर कलाकार.. आणि आमचा कामसू director,कितीही वाजता त्याला कंटाळा येतं च नाही. चक्क तो आडवा पडला.. आश्चर्य” असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. (Vishaka Subhedar)
अनेक विनोदी भूमिका साकारल्यानंतर आणि हास्यजत्रेसारख्या विनोदी रियालिटी कार्यक्रमात काम केल्या नंतर, काही तरी वेगळी भूमिका साकारावी असे विशाखाला वाटल्यामुळे तिने “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कार्यक्रमातून निरोप घेतला. सध्या विशाखा “शुभविवाह” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ती सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शुभविवाह ही मालिका प्रसिद्धी मिळवत असून कार्यक्रमातील सगळीचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली दिसत आहेत. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढू लागली आहे.