सध्या झी मराठी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका घरोघरी पोहोचलीय. मालिकेचे कथानक वेगळे असल्या मुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. नेत्रा म्हणजेच तितिक्षा ही मालिकेची नायिका आहे तर रुपाली म्हणजे ऐश्वर्या नारकर या खलनायिका आहेत. पात्र जस आहे प्रेक्षक त्या पात्र बदल तशाच कल्पना मनात करतात.पण कलाकारांचं ऑफ स्क्रीन बॉण्डिंग आणि ऑन स्क्रीन बॉण्डिंग यात फरक असतो. अनेक नायिका आणि खलनायिका ऑफ स्क्रीन खुप छान मैत्रिणी असतात.(Titiksha Tawde Aishwarya Narkar)
पहा तितिक्षा आणि ऐश्वर्याचं ऑफस्क्रिन बॉण्डिंग (Titiksha Tawde Aishwarya Narkar)
अशीच ही तितिक्षा आणि ऎश्वर्या यांची जोडी आहे. त्या मालिकेत एकमेकींच्या विरोधात उभ्या असल्या तरी पडद्या मागे त्या खूप धमाल करतात. त्यांची ही ऑफसेट धमाल आणि इतर ऍक्टिव्हिटीज यांचे अनेक फोटो, व्हिडिओ, रील्स त्या शेर करत असतात. अ व्हेरी गुड मॉर्निंग विथ द एव्हर-एन्थुसीएसटीक पर्सन असं कॅप्शन देत तितिक्षाने नुकताच एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया वर पोस्ट केलाय त्यात ती आणि ऐश्वर्या योगा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.त्यांच्या या व्हिडिओ वर अनेक कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. पन्नाशीत ही ऐश्वर्या यांच्या एनर्जीच कौतुक सर्वानाच आहे. तर तितिक्षा ही तिच्या निरागसतेने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकते.
एव्हरग्रीन अभिनेत्रीनंमध्ये ऐश्वर्या नारकर यांचं नाव आल्या शिवाय राहत नाही. बालनाट्यापासून सुरवात केली त्या नंतर थांबणे नाहीच. नाटक, मालिका, चित्रपट, हिंदी मालिका, जाहिराती सर्व प्रकारात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मालिका किंवा चित्रपट यापासून सुरुवात न करता ऎश्वर्या यांची सुरुवात जाहीरतींन पासून झाली. जाहिरातींन मुळे त्यांचा चेहरा प्रेक्षकांसाठी ओळखीचा झाला आणि तिथूनच त्यांना सून लाडकी सासरची हा त्यांचा पहिला चित्रपट मिळाला.तसेच महाश्वेता ही त्यांची पहिली मालिका त्या नंतर अनेक मालिकान मधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले.(Titiksha Tawde Aishwarya Narkar)
हे देखील वाचा – मालिकेत नाईट शिफ्ट विशाखाची मज्जाअखंड सुरु
तितिक्षा तावडे ही मालिका विश्वातील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीनं पैकी एक आहे. तिच्या निरागस आणि सोज्वळ अभिनयाने प्रेक्षांच्या नजरेत राहते. असे हे कन्यादान, सरस्वती , तू अशी जवळी रहा या मालिकांमधून ती घराघरात पोचलीय तर जयंती, मिठू या तिच्या चित्रपटांनी मोठ्या पडद्यावर देखील तीच नाव झालंय. ऐश्वर्या आणि तितिक्षा त्यांच्या कामा सोबतच त्यांच्या फोटोशूट्स मुळे देखील विशेष चर्चेत असतात. ऐश्वर्या नारकर यांच्या कडे बघून तर पन्नशीत पंचविशीचा फिटनेस असं म्हणावं लागेल.आणि ही अफलातून जोडी सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय.