महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही, तर बाहेर देशात देखील पाहायला जातो. या कार्यक्रमातील सगळेच स्किट मजेदार असल्यामुळे प्रेक्षकांना इतर विनोदी कार्यक्रमापेक्षा हास्यजत्रा हा कार्यक्रम जास्त आवडताना दिसतो. या कार्यक्रमातील विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर हा अभिनयासोबतच या कार्यक्रमातील स्किटचे लेखन देखील करतो. याचबरोबर प्रसाद याच कार्यक्रमात असलेली अभिनेत्री विशाखा सुभेदार हिच्या सोबत कुर्रर्र या नाटकात काम करतोय. सध्या कुर्रर्र या नाटकाचा दवरा बाहेर गावी सुरु आहे. यानिमित्ताने प्रसादने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीये. (Visakha Felt Bad )
हे देखील वाचा: कोहली कुटूंबात नव्या सदस्याची एंट्री
या फोटोंमध्ये प्रसादने त्याच्या कुर्रर्र नाटकातील सहकलाकारांसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. आणि हे फोटोज प्रसादने डेनवर या शहरात काढले आहेत. या फोटोंना प्रसादने “माझा मनी हाईस्ट मधला पण फेव्हरेट होता तेव्हापासून denver सिटी पहायची होती ….निसर्गाचं वरदहस्त लाभलेलं शहर” असे कॅप्शन दिले आहे. परंतु प्रसादच्या या फोटोंवर विशाखा ची कमेंट लक्षवेधी ठरतेय.

विशाखाने “एखाद्या फोटोत मी सुद्धा असले तर मज्जा आली असती” असे प्रसादला मिश्किल अंदाजात म्हंटले आहे. विशाखाच्या या कमेंटला प्रसादने “ताई तू तो मेरे दिल मे है” असा रिप्लाय केला आहे. म्हणून विशाखाच्या या कमेंटवर एका नेटकऱ्याने “ताई दिल में पण म्हणून फोटोत नाही घेतलं this is not फेअर ताईला सरळ सरळ शेंडी” अशी मजेशीर कमेंट देखील केली आहे. (Visakha Felt Bad )
हे देखील वाचा: या कलाकारांनी दिली महामानवाला मानवंदना
कुर्रर्र हे नाटक फॅमिली बेस नाटक आहे. या नाटकामध्ये प्रसाद खाणंदकर सोबतच विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव तसेच पॅडी कांबळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकाच्या कथानकानुसार नम्रता ,म्हणजेच पूजाच्या लग्नाला खूप वर्ष झालेली असून देखील बाळ होत नाही. त्यात पूजेची आई त्यांच्या घरी राहत असल्यामुळे ती पूजाच्या मागे सतत लागलेली असते की, तुला बाळ कधी होणार. त्यावर पूजा आईला वारंवार समजावर असते. नंतर या नाटकात पॅडीची एंट्री होते, आता त्याच नक्की या नाटकात काय पात्र आहे, हे नाटक पाहिल्यानंतरच हे लक्षात येईल. या नाटकाचे लेखन प्रसाद खांडेकर यानेच केले आहे.