जातिभेद, धर्मभेद तसेच भेदभाव मिटवून समतावादी भारत घडवण्याचे स्वप्न, उरी बाळगणारे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती आहे. आजच्या दिवशी
बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महाराष्ट्रासोबतच संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून महामानवाला मानवंदना दिली आहे. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात हिने हातामध्ये बाबासाहेबांचा फोटो घेतला आहे. या फोटोला वनिताने “उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे” असे कॅप्शन दिले आहे. तसेच हास्यजत्रेतील कलाकार गौरव मोरे याने सुद्धा बाबासाहेबांच्या फोटोजवळ उभा असेलला फोटो शेअर केलाय. या फोटोला गौरवने “We are because,he was” Thank you Babasaheb असे म्हणत बाबासाहेबांचे आभार मानले आहेत. याचबरोबर अनेक रियालिटी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता अंशुमन विचारे, गायिका वैशाली महाडे आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे या कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करून डॉ बाबासाहेब आबेडकरांना मानवंदना दिली आहे.

हे देखील वाचा: सानिया आणि वैदेहीचंऑफस्क्रीन ट्विनिंग
तसेच मराठी सिनेसृष्टीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट तसेच मालिका तयार करण्यात आल्या. “डॉ बाबासाहेब आंबेडकर- महामानवाची गौरवगाथा” या नावाने स्टार प्रवाह या वाहिनीवर आलेली मालिका ही मालिका मोठ्या प्रमाणात पहिली गेली. या मालिकेत बाबासाहेबांचं पात्र अभिनेता सागर देशमुख यांनी साकारलं होतं. गणेश रासने यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. या मालिकेप्रमाणेच मालिकेचे शीर्षक गीत सुद्धा प्रचंड गाजले “भीमराया माझा भीमराया” असे या शीर्षक गीताचे नाव होते. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)

हे देखील वाचा:अश्विनीच या हिरोसोबत काम करण्याचं स्वप्न झालं पूर्ण
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त त्यांच्या धर्मापुरते मर्यादित न राहता, इतर धर्मीय लोकांसाठी सुद्धा कार्य केले. तसेच संपूर्ण जगभरात फिरून आपल्या देशात कशाची कमी आहे, याचा सुष्म पद्धतीने अभ्यास केला. त्यामुळे त्यांची ख्याती जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे फक्त भारतातच नाही तर इतर देशात देखील भीमजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते.
