महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांना हसवण्यासाठी नेहमी सज्ज असतो. प्रेक्षक थकून घरी जाताना,ट्रेन मध्ये किंवा घरी महिला काम करताना, तसेच लहान मुलांना सुट्टी असल्यावर घरी हास्यजत्रा हा कार्यक्रम बघताना दिसतात. जरी सहज कोणी हास्यजत्रा हा कार्यक्रम बघत तर त्या व्यक्तीला टीव्ही समोरून उठायचं मन नाही करत. या कार्यक्रमाचा नवीन भाग एकदाचा कधी येतो, या प्रतिक्षेत लोक असतात. याचबरोबर या कार्यक्रमाची प्रशंसा मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी देखील केली आहे. (Rasika Vengurlekar New Look)
हे देखील वाचा: अपूर्वाच्या भावाने घेतला जगाचा निरोप हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन
तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रियालिटी कार्यक्रमाची क्रेज प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळे स्किट सादर होत असतात. स्किट प्रमाणे कलाकार वेगवेगळा लुक देखील करत असतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री रसिक वेंगुर्लेकर हिने सुद्धा एका स्किटसाठी वेगळा लुक केला आहे. या लूकचा व्हिडीओ रसिकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या लूकमध्ये रसिका गावातल्या बाई प्रमाणे तयार झाली आहे. या लूकसाठी तिने केसांची वेणी करून त्यात फूल माळली आहेत. तसेच रसिकाने तिचे आयब्रो डार्क काळ्या रंगाचे केले आहेत. या व्हिडिओला रसिकाने “सम एक्सपेरीमेंट्स” असे कॅप्शन दिले आहे. रसिकाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी “रसरशीत आज काय ढोल वाजवायचा बेत आहे काय” तसेच तिखट अशा कमेंट केल्या आहेत. (Rasika Vengurlekar New Look)
हे देखील वाचा: हमीदाबाईची कोठी नाटकाचा प्रयोग आणि थिएटरमधून नाना आणि मामांनी काढला पळ
रसिकाने हास्यजत्रा या मालिकेत मध्येच एंट्री घेतली, परंतु तरी सुद्धा रसिका खूप कमी वेळात प्रेक्षकांमध्ये फेमस होत गेली. रसिकांचं कॉमिक टायमिंक आणि तिचा विनोदी अभिनय प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालताना दिसतोय.