12th Fail या चित्रपटामुळे प्रसिध्दीझोतात आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. 12th Fail’ या चित्रपटामुळे विक्रांतला त्याच्या व्यावसायिक आयुष्यात यश मिळाले. पण अभिनेत्याला नुकताच एक मुलगा झाला असून यामुळे खासगी आयुष्यातही आनंद आल्याचे पाहायला मिळाले. विक्रांत बाबा झाल्यामुळे त्याच्यासह अनेक चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. नुकतीच विक्रांतने सोशल मीडियावर आपण बाबा झाल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याला मुलगा झाला असून त्याने हा आनंदाचा क्षण चाहत्यांबरोबर साजरा केला होता.
पत्नी शीतल ठाकूरने ७ फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिला. त्यानंतर आता १६ दिवसांनी दोघांनीही आपल्या बाळाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. विक्रांत व शीतल यांनी त्यांच्यासह बाळाचा एक गोड फोटो शेअर करत त्यांनी आपल्या बाळाचे नाव काय ठेवले याबद्दलही सांगितले आहे. या फोटोमध्ये शीतलने बाळाला आपल्या छातीशी कवटाळून घेतले असून विक्रांत व शीतल आपल्या बाळाकडे अगदी प्रेमाने पाहत आहे.
आणखी वाचा – शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते प्रेम असो वा…; मराठीतील नवी कोरी वेबसीरिज ‘आठवी अ’चं पोस्टर प्रदर्शित
विक्रांत-शीतल यांनी त्यांच्या सोशल मीडियावर बाळाबरोबरचा हा क्युट फोटो शेअर करत त्यांच्या बाळाचे नाव काय ठेवले आहे याबद्दलही सांगितले आहे. विक्रांत व शीतल यांनी बाळाची झलक दाखवणारा एक गोड फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “आशीर्वादापेक्षा कमी काही नाही. आम्ही आमच्या बाळाचे नाव वरदान ठेवले आहे”.
दरम्यान, विक्रांत व शीतल यांनी २०२२ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या २ वर्षांनी त्यांनी चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. विक्रांत-शीतल यांनी आपल्या बाळाची झलक सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळत आहे.