गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते प्रेम असो वा…; मराठीतील नवी कोरी वेबसीरिज ‘आठवी अ’चं पोस्टर प्रदर्शित

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 19, 2024 | 5:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
मराठी वेबसीरिज

मराठी वेबसीरिज

‘शाळा’ हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक अविभाज्य घटक. त्यातही गावाकडची शाळा म्हटलं तर या शाळेत शालेय शिक्षणासह आयुष्याची शिकवण देणारे अनेक धडे अन् कविता शिकायला मिळतात. शाळेचा अभ्यास म्हटला तर कुणी या अभ्यासात खूप हुशार, कुणी कमी अभ्यास करणारा किंवा कुणी अजिबातच अभ्यास न करणारा म्हणजेच रुढार्थाने ‘ढ’ विधार्थी असे अनेक विद्यार्थी आले. त्यातही शाळेतल्या ‘त्या’ वयात आपल्या प्रत्येकालाच कोणी ना कोणी आवडत असतोच. अजाण वयातल्या त्या भावना प्रत्येकासाठीच कायमच विशेष असतात. शाळेतल्या या ‘हुशार’ आणि ‘ढ’ विद्यार्थ्यांचा व त्यांच्यातील प्रेम, मैत्री या भावभावनांचं विश्व उलगडून दाखवण्यासाठी ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत आणि ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल ‘आठवी अ’ ही एक नवी कोरी सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Athvi a webseries)

शाळेतल्या आठवणींना उजाळा देतानाच, या वयातील प्रत्येकाचे अनुभव, त्या वयातील यारी, तसेच त्या अजाण वयातील नितळ प्रेमभावना यावर भाष्य करणारी ही प्रेमळ वेबसीरिज लवकरच युट्युबच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून या पोस्टरला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांच्यावर पत्नीचे गंभीर आरोप, स्वतः आहे IAS, पतीची संपूर्ण जागा विकायची आहे आणि…

‘आठवी अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे. सीरिजचे सह दिग्दर्शक नितीन वाडेवाले हे आहेत. तर संगीत मंदार पाटील यांनी केले आहे. सीरिजचे छायांकन यश भागरे, स्वप्नील पोळ व अमित चव्हाण यांनी केले आहे आणि कला दिग्दर्शन सोनाली घाडगे यांनी केले आहे. तर निर्मिती प्रमुख विनीत पवार व ध्वनी राजेश्वरी पवार यांनी केले आहे. त्याचबरोबर सह संकलनाची जबाबदारी जय लोरे यांनी पार पाडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – माहेरचं घर सोडताना होणाऱ्या बायकोचं भरुन आलं मन, प्रथमेश परबला पाहवेना, म्हणाला, “तुला एवढं प्रेम देऊ की…”

मीडिया वन सोल्युशन्स आणि शौरिन दत्ता निर्मित ‘आठवी अ’ या सीरिजचे प्रोजेक्ट प्रमुख अनंत श्रीवास्तवा व जैमिन शिगवण हे आहेत. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे असून फायनान्सचा पदभार विशाल मेनारिया यांनी स्वीकारला आहे. दरम्यान, ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, मीडिया वन सोल्युशन्स आणि शौरिन दत्ता निर्मित ‘आठवी अ’ ही नवी कोरी वेबसीरिज ४ मार्चपासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज प्रेक्षकांना इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.

Tags: Athvi a webseriesentertainmentits majjamarathi industrymarathi webseries
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Ashok Shinde narrated the experience of his clothes catching fire while shooting for film

…अन् तो सीन शूट करत असताना अंगावरील कपड्यांनी घेतला पेट, अशोक शिंदेंनी सांगितला 'तो' भयावह प्रसंग, म्हणाले, "आगीच्या झळा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.