बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विक्रांत मेस्सी व शीतल ठाकूर यांनी पाहिल्यांदाच दाखवली बाळाची खास झलक, नावही जाहीर केले, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाले…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 24, 2024 | 9:28 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Vikrant massey and Sheetal Thakur showed a special glimpse of the baby boy

विक्रांत मेस्सी व शीतल ठाकूर यांनी पाहिल्यांदाच दाखवली बाळाची खास झलक, नावही जाहीर केले, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाले...

12th Fail या चित्रपटामुळे प्रसिध्दीझोतात आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. 12th Fail’ या चित्रपटामुळे विक्रांतला त्याच्या व्यावसायिक आयुष्यात यश मिळाले. पण अभिनेत्याला नुकताच एक मुलगा झाला असून यामुळे खासगी आयुष्यातही आनंद आल्याचे पाहायला मिळाले. विक्रांत बाबा झाल्यामुळे त्याच्यासह अनेक चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. नुकतीच विक्रांतने सोशल मीडियावर आपण बाबा झाल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याला मुलगा झाला असून त्याने हा आनंदाचा क्षण चाहत्यांबरोबर साजरा केला होता.

पत्नी शीतल ठाकूरने ७ फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिला. त्यानंतर आता १६ दिवसांनी दोघांनीही आपल्या बाळाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. विक्रांत व शीतल यांनी त्यांच्यासह बाळाचा एक गोड फोटो शेअर करत त्यांनी आपल्या बाळाचे नाव काय ठेवले याबद्दलही सांगितले आहे. या फोटोमध्ये शीतलने बाळाला आपल्या छातीशी कवटाळून घेतले असून विक्रांत व शीतल आपल्या बाळाकडे अगदी प्रेमाने पाहत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

आणखी वाचा – शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते प्रेम असो वा…; मराठीतील नवी कोरी वेबसीरिज ‘आठवी अ’चं पोस्टर प्रदर्शित

विक्रांत-शीतल यांनी त्यांच्या सोशल मीडियावर बाळाबरोबरचा हा क्युट फोटो शेअर करत त्यांच्या बाळाचे नाव काय ठेवले आहे याबद्दलही सांगितले आहे. विक्रांत व शीतल यांनी बाळाची झलक दाखवणारा एक गोड फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “आशीर्वादापेक्षा कमी काही नाही. आम्ही आमच्या बाळाचे नाव वरदान ठेवले आहे”.

आणखी वाचा – …अन् तो सीन शूट करत असताना अंगावरील कपड्यांनी घेतला पेट, अशोक शिंदेंनी सांगितला ‘तो’ भयावह प्रसंग, म्हणाले, “आगीच्या झळा…”

दरम्यान, विक्रांत व शीतल यांनी २०२२ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या २ वर्षांनी त्यांनी चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. विक्रांत-शीतल यांनी आपल्या बाळाची झलक सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळत आहे.  

Tags: शीतल ठाकूरमनोरंजन बातमीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड मनोरंजन बातमीबॉलिवूड बातमीविक्रांत मेस्सीbollywood actorBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsSheetal ThakurVikrant MessiVikrant Messi Baby
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
divya Agarwal shared cryptic post on her pregnancy rumors before wedding

लग्नाआधीच गरोदर असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर दिव्या अग्रवाल भडकली, पोस्ट शेअर करत म्हणाली, “नेहमी फालतू बोलण्याची...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.