टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता विकास सेठी यांच्या निधनाची बातमी समोर आली. ४८ वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूने लोकांना धक्का बसला आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. क्योंकि सास भी कभी बहू,’ ‘कहीं तो होगा’ आणि ‘ससुराल सिमर का’ या मालिकांसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय टीव्ही अभिनेता विकास सेठी याने अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याला जीव गमवावा लागला. आता त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने पीटीआयशी संवाद साधला असून मृत्यूपूर्वी अभिनेत्याची अवस्था कशी होती याबाबत तिने भाष्य केलं आहे. (Vikas Sethi Passes Away)
‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’ आणि ‘ससुराल सिमर का’ सारख्या मालिकेतून विकास सेठीचे घराघरात नाव कोरले होते. अभिनेता विकास सेठीचे शनिवारी रात्री झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विकासची पत्नी जान्हवी सेठीच्या म्हणण्यानुसार, तो एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाशिकला गेला होता. अभिनेत्याला उलट्या होत होत्या आणि जुलाब होत होते, पण त्याला रुग्णालयात जायचे नव्हते. झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा – Video : गणपती विसर्जनात बेधुंद होऊन थिरकले अनंत अंबानी व राधिका मर्चंट, एकमेकांना गुलालही लावला अन्…
त्याची पत्नी म्हणाली, “आम्ही नाशिकमध्ये माझ्या आईच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याला उलट्या आणि जुलाब होत होते. त्याला दवाखान्यात जायचे नव्हते म्हणून आम्ही डॉक्टरांना घरी यायला सांगितले. रविवारी सकाळी ६ च्या सुमारास मी त्याला उठवायला गेले तेव्हा तो नव्हता. शनिवारी रात्री झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले”. जान्हवीने सांगितले की, “त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आज सोमवारी मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत”.
आणखी वाचा – अंकिता लोखंडे व निया शर्माचा डान्स व्हिडीओ व्हायरल, पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “पूजेच्या नावाखाली तमाशा…”
विकास हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा होता. तिने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ससुराल सिमर का’ आणि ‘ये वादा रहा’ यांसारख्या डेली सोपमध्येही काम केले आहे. २००१ मध्ये आलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या हिट चित्रपटाचा तो भाग होता. यामध्ये त्याने करीना कपूरच्या भावाची रॉबीची भूमिका साकारली होती. त्याने ‘दीवानापन’, ‘उप्स’, ‘मोध’ आणि ‘आयस्मार्ट शंकर’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याचे पहिले लग्न फार काळ टिकले नाही. पहिली पत्नी अमितासह ते डान्स रिॲलिटी शो ‘नच बलिये’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. २०१८ मध्ये त्याने जान्हवीशी लग्न केले आणि २०२१ मध्ये दोघेही आई-वडील झाले.