बऱ्याच कालावधी पासून ‘बिग बॉस’ मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. प्रत्येक हंगामाप्रमाणे मराठी ‘बिग बॉस’ सिझन ५ ची सुद्धा सर्वत्र चर्चा आहे. मराठी ‘बिग बॉस’च्या या पर्वात असणाऱ्या वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सुरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे यांच्यासह अन्य सदस्यांच्या दमदार खेळीने प्रेक्षकांचं चांगलाच मनोरंजन सुरु आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांच्या खेळीने आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च घर आता चर्चेत आलं आहे ते म्हणजे वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून आलेल्या संग्राम चौगुलेमुळे. ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री होताच संग्रामने त्याचा खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. (Sangram Chougule Marathi Big Boss)
‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी संग्रामने रितेश देशमुखसह एक टास्क पूर्ण केला. या टास्क दरम्यान संग्रामला त्याच्या मते टॉप पाच खेळाडू कोण वाटतात असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत संग्रामने त्याच्या मते टॉप ५ सदस्यांची नावं सांगितली. संग्रामने अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर या ५ सदस्यांची नावं घेत हे सदस्य टॉप ५ मध्ये का असतील याची कारणं सुद्धा दिली आहेत.
हे देखील वाचा- Bigg Boss Marathi : “वाईल्ड कार्डमध्ये मुलगी हवी”, लाजत-लाजत सूरज चव्हाण असं काही बोलून गेला अन्…; स्पर्धकांनीही उडविली खिल्ली
अभिजीतच कौतुक करत संग्राम म्हणाला “अभिजीत दोन्ही टीममध्ये मिळून मिसळून राहतोय. त्याला दोन्ही टीमच्या स्ट्रॅटजी चांगल्या कळतात. टीममध्ये जहालवादी मताची माणसं आहेत पण अभिजीतकडे त्यांना समजून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो पहिल्या क्रमांकाचं स्थान टिकवून ठेवण्यात त्याला यश येईल. अभिजीतला भावना चांगल्या संभाळता येतात. जिथे त्याला वाटतं त्याला धोका आहे तिथे तो निक्कीला समोर ठेऊन ती परिस्थती सांभाळून घेतो. (Sangram Chougule Marathi Big Boss)
हे देखील वाचा- इकोफ्रेंडली मूर्ती बनवली, घरातच विसर्जन केलं अन्… देशमुखांची परंपरा जपली, रितेशसह मुलांचही होतंय कौतुक
पुढे निक्की बद्दल बोलताना संग्राम म्हणाला, “कोणी वंदा, कोणी निंदा, कॅमेरासमोर दिसं हाच माझा धंदा असं तिचं आहे म्हणून मला वाटतं ती दुसऱ्या स्थानावर आहे. सूरजला महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळतोय. बिग बॉसच्या घरातील त्याची सगळी काम तो चांगल्या पद्धतीने करतो. त्याला कधी कधी खेळ कळत नाही म्हणून तो जरा मागे पडतो. पण तरीही प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तो तिसऱ्या स्थाना पर्यंत मजल मारेल एवढं नक्की.” अरबाज पटेल बद्दल बोलताना संग्राम म्हणाला,”ज्या गोष्टी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या मलाच काय प्रेक्षकांना देखील पटत नाहीयेत. आपण एका जबाबदार शो मध्ये आहोत इथे काहीही करण्यापेक्षा बाहेर जाऊन आपण प्रेक्षकांना काय दाखवणार आहोत या कडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्याची फॅन फॉलोइंग जास्त आहे त्यामुळे तो चौथ्या स्थानकापर्यंत पोहचेल.