सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता लोखंडे व निया शर्माचा डान्स व्हिडीओ व्हायरल, पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “पूजेच्या नावाखाली तमाशा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 9, 2024 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita lokhande and nia sharma dance video

अंकिता लोखंडे व निया शर्माचा डान्स व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र गणपतीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्याच घरात बाप्पा विराजमान झाले आहेत. अनेक टेलिव्हिजन कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटीज यांच्या घरी गणपती असल्याचे पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले. अंकिताच्या घरात यावेळी उत्साहाचे वातावरण असलेले पाहायला मिळाले. तिने अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये अंकिताचा उत्साह दिसून येत आहे. अशातच अंकिताचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप नाराजी दर्शवली आहे. (ankita lokhande and nia sharma dance video)

सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्याबरोबर निया शर्मादेखील दिसून येत आहे. यामध्ये दोघीही एकदम धमाल डान्स करताना दिसत आहेत. पण त्यांचा डान्स बघून सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संतापजनक प्रतिरकियादेखील दिल्या आहेत. गणपती पूजेच्या नावाखाली सगळा विचित्र प्रकार सुरु असल्याचेही म्हंटले आहे.

आणखी वाचा – काय असणार दीपिका पदुकोण व रणवीर सिंहच्या लेकीचं नाव? अभिनेत्याने केला होता खुलासा, पण…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडीओवर एकाने प्रतिक्रिया देत म्हटलं की, “हे बघून असं वाटत आहे की देवाच्या नावावर पूजा नाही तमाशा सुरु आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “अंकिताचं असं वागणं पाहून विकीला २१ तोफांची सलामी द्यावीशी वाटते”, त्यानंतर अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “गल्लीतल्या मुली जशा नाचतात तशीच अंकिता नाचत आहे”. त्यानंतर सुशांतच्या आठवणीतही एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “सुशांत सगळं बघत असणार”. काहींनी तर नाचून नौटंकी करत असल्याचेही म्हटलं आहे.

आणखी वाचा – इकोफ्रेंडली मूर्ती बनवली, घरातच विसर्जन केलं अन्… देशमुखांची परंपरा जपली, रितेशसह मुलांचही होतंय कौतुक

मात्र तिच्या चाहत्यांनी ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे. एकाने लिहिले की, “बाप्पाच्या स्वागताला ती जर खुश असेल तर तुम्हाला काय समस्या आहेत”. तसेच अनेकांनी तिची स्तुती करत लिहिले की, “अंकिताचा चेहरा नेहमी हसतमुख असतो. तिला असं बघून खूप छान वाटतं”. दरम्यान आता अंकिताचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tags: ankita lokhandedance videonia sharma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 suraj chavan wish

Bigg Boss Marathi : "वाईल्ड कार्डमध्ये मुलगी हवी", लाजत-लाजत सूरज चव्हाण असं काही बोलून गेला अन्…; स्पर्धकांनीही उडविली खिल्ली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.