सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अंबानी कुटुंबाने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. या सेलिब्रेशनला त्यांचे जवळचे मित्र व बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. बाप्पाला विराजमान केल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय रविवारी रात्री गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते. मुकेश अंबानी- नीता अंबानीपासून नवविवाहित जोडपं अनंत अंबानी-राधिका मर्चंटने घरच्या गणरायाला निरोप दिला. अनंत व राधिका यांचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे दोघेही यावेळी खूप खुश दिसले. (Anant Ambani – Radhika Merchant Ganeshotsav)
अनंत व राधिका गणपती विसर्जन दरम्यान ढोल-ताशाच्या तालावर नाचताना दिसले. यावेळी सर्वजण पारंपरिक वेशभूषेत होते. नीता अंबानी गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांची सून राधिका निळ्या रंगाचा कुर्ता परिधान करत दिसली. हे सर्वजण गणपती बाप्पासाठी सजवलेल्या ट्रकमध्ये बसून त्यांच्या मुंबईतील अँटिलिया या घरापासून चौपाटी बीचवरील विसर्जनस्थळी गेले. या शुभ प्रसंगी नीता अंबानी यांनी सुंदर नक्षीकाम केलेली साडी निवडली, तर मुकेश अंबानी यांनी कुर्ता पायजमा घातला. नवविवाहित जोडपे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट देखील गणेशाचे आशीर्वाद घेताना दिसले.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Anant Ambani and Radhika Merchant participated in the Ganesh Idol Immersion programme at Girgaon Chowpatty pic.twitter.com/nLsisGghqu
— ANI (@ANI) September 8, 2024
अभिनेता मीजान जाफरी व शनाया कपूर देखील गणपती विसर्जनाच्या वेळी अंबानी कुटुंबात सामील झाले होते. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील काही दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमान खान, करीना कपूर, रेखा, सैफ अली खान, अर्जुन कपूर, बोनी कपूर, सारा अली खान, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, सोनम कपूर आणि इतर अनेकांनी अंबानींच्या घरी जात गणरायाचे दर्शन घेतले. या शुभ दिनी गायक बी प्राक हेही खास पाहुण्यांमध्ये होते.
गायक बी प्राक यांनी गणपती पूजेच्या वेळी सर्व भाविकांना आपल्या भावपूर्ण अभिनयाने मंत्रमुग्ध केले. गणेशोत्सवात भगवान गणेशाची नवीन सुरुवात आणि अडथळे दूर करणारी देवता म्हणून पूजा केली जाते. त्यांच्या सुख व समृद्धीची कामना केली जाते. गणेशोत्सवादरम्यान, लोक सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरांमध्ये गणपतीची मूर्ती स्थापित करतात आणि पूजा करतात.