कोळीवाड्याची रेखा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिताने तिच्या विनोदी अभिनय कौशल्याने चाहत्यांना नेहमीच भुरळ घातली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे वनिताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या लोकप्रिय कार्यक्रमा व्यतिरिक्त वनिता चित्रपटांमधूनही पाहायला मिळते. शिवाय सोशल मीडियावर देखील वनिता खूपच सक्रिय असते. तिच्या विनोदी शैलीने तर ती नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करते तर वनिताचे फोटोशूटही कायम चर्चेत असतात.(vanita kharat rohit shetty)
पहा वनिता खरात दिसणार रोहित शेट्टीसोबत (vanita kharat rohit shetty)
वनिता आता नुकत्याच घोषित केलेल्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ या रोहित शेट्टी यांच्या बिग बजेट चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून वनिताला मोठ्या पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. वनितासोबत या चित्रपटात तेजस्वी प्रकाश, करण परब, जितेंद्र जोशी या कलाकारांना पाहणेही रंजक ठरणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटात वनिताचा विनोदी अंदाज असल्याचं कळतंय.
====
====
ब्लॉकबस्टर दिग्दर्शक अशी ज्यांची ओळख आहे ते रोहित शेट्टी पहिल्यांदाच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ असे या मराठी चित्रपटाचे नाव असून याची निर्मिती सुद्धा रोहित शेट्टी यांची आहे. नुकतंच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश मुख्य भूमीकेत दिसणार आहे. त्यासोबतच चित्रपटात करण परब मुख्य नायक आहे. ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ हा कौटुंबिक चित्रपट असून ट्रेलरमध्ये एक तरुण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील आव्हाने आणि आनंद कशा प्रकारे सांभाळतो याचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे.(vanita kharat rohit shetty)

रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने रोहित शेट्टी, पवित्रा गांधी आणि विवेक शाह निर्मित हा चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी पेलवली आहे. हा बहुचर्चित आणि बिग बजेट चित्रपट येत्या १४ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याकडे आता रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
