बरेच कलाकार असे आहेत ज्यांचा सिनेइंडस्ट्रीत कोणी वारसा नसताना ते स्वमेहनतीवर आपल्या पायावर उभे आहेत. दरम्यान बरेच कलाकार हे मुंबई बाहेरून आल्यामुळे स्ट्रगल काळात बरेचदा त्यांच्याकडे राहायला घर ही नसत. त्यावेळी मात्र सिनेविश्वातील त्यांच्या परिचयाच्या वा सहकलाकारांच्या घरी बऱ्याच रात्री काढलेल्या असतात. आणि हे मेहनतीचे क्षण आठवले की त्यांना त्यांच्या स्ट्रगल लाईफ मध्ये उपयोगी पडलेल्या मित्रमंडळींची आठवण आल्यावाचून राहत नाही. असच काहीस घडलं आहे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर सोबत. घराची गोष्ट या सेगमेंट मध्ये इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रियदर्शिनीने तिच्या मुंबईत आल्या दिवस पासूनच्या घराची गोष्ट सांगितली. आज मुंबईत ती स्थित जरी झाली असली तरी प्रियदर्शिनी सध्या अंधेरीत एका भाड्याच्या घरामध्ये राहतेय. (priydarshini indalkar)
पहा प्रियदर्शिनीच्या घराची गोष्ट (priydarshini indalkar)
मुलाखतीदरम्यान प्रियदर्शनी म्हणाली, “गेल्या दिड वर्षांपासून मी मुंबईमध्ये राहत आहे. मी आणि अभिनेत्री आरती मोरे एकत्र राहतो. आधी आम्ही दोघीही वेगळ्या घरात राहत होतो. पण ते घर आमच्या घरमालकांनी काही कारणास्तव विकलं. त्यानंतर आरती आणि मी मिळून दुसरं घर पाहिलं आणि आरतीच्या रुपाने मला खूप चांगली फ्लटमेटमिळाली आहे. अजूनही आमच्यामध्ये अजूनपर्यंत भांडणं झालेली नाहीत. वयाने आरती मोठी आहे माझ्यापेक्षा त्यामुळे तिच्यामध्ये मोठी ताई, आई हे बागेचं भाव माझ्या बाबतीत तरी आहेत. गमतीच्या स्वरात प्रियदर्शिनी म्हणाली, आणि छान संसार चाललाय आमचा. खरच आमचा छान आणि सुखाचा संसार चाललाय.
पुढे बोलताना प्रियदर्शिनीने मुंबईत पहिल्यांदा आल्यावर मुंबईत राहण्याबद्दल भाष्य केलं “‘आमच्या हिचं प्रकरण’ हे व्यावसायिक नाटक करत असताना या नाटकादरम्यान मी मुंबईमध्ये येऊ लागले. या नाटकामध्ये भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर यांच्याही भूमिका होत्या. सलग शनिवार, रविवार जेव्हा नाटकाचे प्रयोग असायचे तेव्हा मी नंदिता किंवा भार्गवी ताईकडे राहायचे. भार्गवी ताईकडेच मी खूप वेळा राहिली आहे. तेच माझं मुंबईतलं पहिलं घर होतं. नाटकात ती माझी आई होती. खऱ्या आयुष्यातही ती मला मुलीसारखीच जपायची.”
====
हे देखील वाचा – रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात वनिता खरातची वर्णी
====
या पुढे बोलताना प्रियदर्शनी म्हणाली, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये जेव्हा मी सहभाग घेतला तेव्हाही मी पुणे ते मुंबई प्रवास करायचे. तेव्हाही मुंबईमध्ये माझ्याकडे घर नव्हतं. जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची रिहर्सल असायची तेव्हा पहाटे मी पुण्यावरुन शिवनेरीने निघायचे. दोन रात्र कुठेतरी राहायचं आणि तिसऱ्या दिवशी शूट करुन पुन्हा पुण्याला निघायचे. आठवड्यातून एकदा तरी असं व्हायचच. (priydarshini indalkar)
शिवालीही तेव्हा कल्याणला राहत होती. वनिता वरळीमध्ये राहत होती. रिहर्सल उशीरापर्यंत असल्यामुळे प्रत्येकाला घरी पोहोचणं शक्य नव्हतं. मग आम्ही रात्री कोणाचं तरी घर शोधायचो आणि तिथेच रात्री राहायचो”. “लॉकडाऊननंतर वनिता कांदिवलीला राहायला आली होती. मग तेव्हा मी वनिताकडे राहायला लागले. त्यामुळे वनिता हे माझं दुसरं घर होतं.
शिवाली परब आणि मी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. पण ‘असं माहेर नको गं बाई’ या मालिकेचं चित्रीकरण ठाण्यात होतं. त्यामुळे आम्ही एकत्र राहिलो नाही. पण दोन महिने शिवाली आणि मी एकत्र राहिलो”. ते माझं तिसरं घर होत असं म्हणायला हरकत नाही.
आज वयाच्या २५व्या वर्षी प्रियदर्शिनी कमवत असून ती स्वकमाईने भाड्याच्या घरात राहत आहे. स्वतःच घर असण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रियदर्शिनी म्हणाली, मला खूप आधीपासून वाटतंय की माझं स्वतःच घर असावं. आणि त्यातली जागा ही मी स्वतः निर्माण करावी. जेव्हा मी कोणाच्या घरी जाते आणि तिथे एखादी गोष्ट आवडली तर मी म्हणायचे अरे वा हे मस्त आहे, मला हे माझ्या घरात ही हवंय. (priydarshini indalkar)
लवकरच प्रियदर्शिनी स्वकमाईचं मुंबईत घर घेईल यांत वादच नाही. तीच हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो हीच इट्स मज्जा कडून सदिच्छा.