रात्रीस खेळ चाले मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. तिच्या शेवंता या भूमिकेने तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावलं. त्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये अपूर्वाने चांगलाच कल्ला केला. एक स्पर्धक म्हणून ती उत्तम खेळली. मलिकाविश्वात अपूर्वाने कायमच आपल्या अभिनयाची छाप पाडली. अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रीय असते. नुकतंच अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (apurva nemlekar photo caption)
अपूर्वाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रंगीत पेहराव केलेले फोटो पोस्ट केलेत तर त्या फोटोना ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर करूनही त्यातले काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या अदांनी तर ती नेहमीच सगळ्यांना घायाळ करते. अशातच अपूर्वाच्या फोटोंपेक्षा तिच्या कॅप्शनने साऱ्यांचं अधिक लक्ष वेधून घेतले आहे. अपूर्वाने फोटो पोस्ट करत दिलेलं कॅप्शन हे तिच्या खाजगी आयुष्यावर भाष्य करतंय.
पहा काय म्हणाली अपूर्वा (apurva nemlekar photo caption)
“मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण एकट्याने घालवले आहेत. पण त्यावेळी लोकांना वाटायचं की मी ठीक आहे. त्यामुळे मी आता जशी आहे, त्याचा मला अभिमान आहे”, ते लिहत तिने एक फोटो पोस्ट केलाय. तर दुसऱ्या फोटोला तिने लिहिलंय, मी काल जी स्त्री होते, तिने आज मी आहे त्या स्त्रीशी माझी ओळख करून दिली. आणि मी उद्या जी स्त्री होणार आहे तिला भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तिच्या सुंदर फोटोंपेक्षा वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणाऱ्या या तिच्या कॅप्शननी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. (apurva nemlekar photo caption)
====
हे देखील वाचा – “आणि कपाटावर तो फोटो अजूनही आहे” गावच्या आठवणीत रमला पृथ्वीक
====
अपूर्वा नेमळेकरचे वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत असते. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अपूर्वा रोहन देशपांडे सोबत लग्नबंधनात अडकली होती. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडायला लागले आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अपूर्वा ही एकटीच आहे. या तिच्या एकटेपणात तिने बरेच चढ उतार पाहिले दरम्यान त्यावेळी ती ठीक असल्याचे सर्वांना वाटत होते मात्र तिच्या एकटेपणाची झळ तिने कुणाला जाणवू दिली नाही, यावरच भाष्य करणारे कॅप्शन अपूर्वाने फोटोसोबत शेअर केले आहे.