“आई कुठे काय करते” ही मालिकाविश्वातील प्रसिद्ध मालिका असून प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड प्रेम करतात. ही मालिका अरुंधती या पात्राच्या भोवताली फिरताना दिसते. एक स्त्री आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी किती प्रयत्न करते, तरी तिच्या कुटुंबाला तिच्या या प्रयत्नांची जाणीव असते का? हा प्रसंग दर्शवणारी ही मालिका आहे.(urmila kothare)
पहा उर्मिलाने शेअर केलेली व्हिडीओ (urmila kothare)
मालिकेच्या कथेनुसार अरुंधती चा नवरा अनिरुद्ध हा परस्त्रीच्या प्रेमात पडतो आणि हे अरुंधतीला समजल्यानंतर त्यांच्यात कायमचा दुरावा निर्माण होतो. सध्या या मालिकेत अरुंधतीचा दुसरा विवाह झाला असून अनिरुद्धला तिचा हा निर्णय पटलेला नाहीये. अरुंधतीचा दुसरा विवाह होण्याआधी अनिरुद्ध नको ते प्रयत्न करत असतो. परंतु त्याचे सर्व प्रयत्न फेल होतात आणि अखेर अरुंधतीचा विवाह आशुतोष सोबत होतो. आई कुठे काय करते या मालिकेचा चाहतावर्ग सामान्य माणसांपासून ते कलाकारापर्यंत आहे. या मालिकेचे प्रेक्षक या मालिकेत दाखविले जाणारे प्रसंग त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. उर्मिला कोठारे देखील या मालिकेची चाहती असून तिने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर मालिकेतील एक प्रसंग स्टोरीद्वारे शेअर केलाय.

प्रेमात स्वतःला झोकून देणं वेगळं आणि स्वतःला हरवून बसणं वेगळं, मी अनिरुद्धच्या प्रेमात स्वतःला हरवून बसले, आणि जेव्हा माझे डोळे उघडले ना तेव्हा सगळ्यात जास्त कष्ट मला स्वतःला शोधण्यासाठी लागले. असं अरुंधती ईशाला सांगतानाचा हा व्हिडियो आहे.(urmila kothare)
उर्मिला आणि आदिनाथ यांच्यात मध्यन्तरी खटके उडाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर फिरत होत्या, उर्मिलाने हा व्हिडियो शेअर केल्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात जसे चढउतार आले तसे उर्मिला च्या आयुष्यात तर आले नसतील ना असा प्रश्न चाहत्यांना आता पडला आहे.
====
हे देखील वाचा – ईशा केसकर वर्कआउट कडे देतेय विशेष लक्ष; ऍब्स दाखवत फोटो केला शेअर
====
उर्मिला सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते आणि विविध प्रकारचे रील तसेच तिच्या मुलीचे व्हिडियो सुद्धा ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या उर्मिलाचा आणि तिच्या लेकीचा गुढीपाडवा निमित्ताने केलेलं फोटो शूट चांगलाच वायरल होतंय.
