‘सरला एक कोटी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री ईशा केसकर बरीच चर्चेत राहिली. तर माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया या पात्राने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिकांमधून ईशाने अभिनयाची छाप सोडली. ईशा मालिका चित्रपटांबरोबरच तिच्या फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते. सोशल मीडियावरही ईशाचा वावर बऱ्यापैकी आहे. अशातच ईशाने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (isha keskar)
पहा ईशाची वर्कआउट मेहनत (isha keskar)
इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत इशाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये ईशाने वर्कआउट झाल्यानंतरचा तिचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ईशाचे ऍब्स दिसून येत असून ईशा सध्या वर्कआउट कडे जास्त लक्ष देताना दिसून येत आहे. ईशा सुरुवातीपासूनच फिटनेस कडे विशेष लक्ष देते याबाबतचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर अधून मधून पोस्ट करत असते.

ईशाच्या फोटोशूटची सोशल मीडियावर वेगळीच हवा आहे. तिच्या फोटोशूटने ती साऱ्यांना वेड लावतच असते. (isha keskar)
====
हे देखील वाचा – अरुंधतीला स्पर्श करताना आशुतोष घाबरला, व्हिडिओ पाहून चाहत्यांना हसू आवरेना
====
ईशा केसकरला झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ मालिकेत ही पाहायला मिळाली. या मालिकेतील तिची बानूची भूमिका प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरली होती. ईशा तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. पण त्याचबरोबरीने तिचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. ईशा काही वर्षांपासून अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. (isha keskar)
ऋषी व ईशाने त्यांच्या नात्याची सोशल मीडियाद्वारे जाहिरपणे कबुली दिली. दोघंही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. तसेच एकमेकांवर असलेलं प्रेम ईशा व ऋषी खुलेपणाने व्यक्त करतात. दरम्यान आता हे दोघे कलाकार कधी विवाहबंधनात अडकणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
