उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी सिनेसृष्टी मधील आवडत आणि चर्चेत असणार जोडपं आहे. त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो व्हिडिओज कायम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. आणि एक आदर्श जोडपं म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जात. आज प्रियाच्या वडिलांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने उमेश आणि प्रियाने त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. (Umesh kamat Priya Bapat)
पाहा काय आहे उमेशची खास पोस्ट ? Umesh kamat Priya Bapat
त्या फोटोला त्याने विशेष असं कॅप्शन दिल आहे.उमेशन म्हंटल आहे,प्रिय बाबा तुम्हला ८१ व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.सासरे असूनही तुमच्या मुलीपेक्षा माझी बाजू जास्त घेता. यावर प्रिया चिडत असली तरी मला खूप आनंद वाटतो.तुम्ही जावयासारखं नाही, वडील-मुलासारखं हक्काचं नातं आपल्यात तयार होऊ दिलंत.तुमचं मेहनती असणं, साधं राहणं,ऍक्टिव्ह राहणं, काम करत राहणं हे माझ्यासाठी कायम आदर्श असेल. प्रेत्येकाला अपेक्षित असणारी एक जावई आणि सासऱ्याची जोडी त्यांच्यात पाहायला मिळते.

तर प्रियाने देखील आजवर वडिलांनी तिच्या साठी जे काही केलं, जितक्या खंबीरपणे तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी उभे राहिले. याबद्दल वडिलांचे आभार मानले आहेत.बाप लेकीचं नातं कायमच खास असत यात काही शंकाच नाही.प्रियाने म्हंटल आहे, मी कितीही आईवेडी असले,तरीही माझ्या वडिलांशी असलेलं माझं नातं जास्त युनिक आहे. प्रत्येक मोठा निर्णय घेताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचं मत विचारात घेणारे माझे बाबा,आवाजावी हट्ट नाही पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व लाड करणारे माझे बाबा. (Umesh kamat Priya Bapat)

आपल्या आई -वडिलांविषयी, कुटुंबाविषयी प्रत्येकालाच आदर असतो. लग्नानंतर मुलीने जोडीदाराच्या कुटुंबाला आपलस करावं हा एक सामाजिक नियमच आहे. पण त्याच सोबत पतीची ही पत्नीच्या कुटुंबाबत तितकीच जबाबदारी आहे. त्यांना आपलस करणे महत्वाचं आहे. आणि उमेश च्या या पोस्ट वरून एका उत्तम जोडीदाराप्रमाणे तो एक आदर्श जावई आणि माणूस आहे हे आपल्याला कळून येते.
हे देखील वाचा : ‘प्रियाच्या बालपणीचं घर’ -आठवणीत शेअर केला व्हिडिओ