शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“उच्च-नीच, अस्पृश्यता अन्…”, झोमॅटोच्या शुद्ध शाकाहारी वादावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “मांसाहारी-शाकाहारी करण्यापेक्षा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 1, 2024 | 2:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Twinkle Khanna On Zomato

"उच्च-नीच, अस्पृश्यता अन्...", झोमॅटोच्या शुद्ध शाकाहारी वादावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर, म्हणाली, "मांसाहारी-शाकाहारी करण्यापेक्षा..."

शुद्ध शाकाहारी अन्न वितरणासाठी स्वतंत्र लोक नियुक्त करणार असल्याचं झोमॅटोने जाहीर केले, तेव्हापासून याची चांगलीच चर्चा रंगली. इतकंच नव्हे तर त्यांची डिलिव्हरी टीम हिरवे कपडे परिधान करेल आणि त्यांना शुद्ध शाकाहारी फ्लीट असे म्हटले जाईल. या सुविधेत लोकांना फक्त शुद्ध शाकाहारी पदार्थ विकणाऱ्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करण्याचे स्वातंत्र्य असेल. झोमॅटोच्या या घोषणेवर बराच वाद झाला होता. आता ट्विंकल खन्नाने या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. (Twinkle Khanna On Zomato)

‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेल्या लेखात तिने असे म्हटले आहे की, “झोमॅटोने कदाचित पाहिले असेल की ही एक गरज आहे जी इतर कोणीही पूर्ण करत नाही आणि त्यातून त्यांनी नफा मिळविण्याचा विचार केला असेल. शाकाहारी लोकांच्या विपरीत, शुद्ध शाकाहारींमध्ये जात, भेदभाव आणि अस्पृश्यतेची चिन्हे आहेत”. ट्विंकल खन्ना यांनी लिहिले आहे की, “झोमॅटोच्या लोकांनी तेच केले जे यशस्वी उद्योजक करण्यासाठी ओळखले जातात. अशी गरज पहा जी इतर कोणीही पूर्ण करत नाही, ती सेवा प्रदान करा आणि नफा मिळवा. अन्नाची शुद्ध आणि अशुद्ध अशी विभागणी केली जाते आणि वितरणासाठी एक टीम तयार केली जाते, ज्यांना हिरवे कपडे घालावे लागतात”.

आणखी वाचा – गोविंदाच्या भाचीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, आरती सिंहचं सजलं घर, फोटो शेअर करत म्हणाली, “नवी सुरुवात…”

ट्विंकल खन्ना म्हणाली, “हे पाहता, असे दिसते की, हा निर्णय अशा लोकांसाठी उपाय आहे ज्यांना विशिष्ट प्रकारचे अन्न आवश्यक आहे, परंतु प्रत्यक्षात ते हे विसरले की शाकाहारी आणि मांसाहारी यापेक्षा वेगळे, शुद्ध शाकाहारीमध्ये जातीचा अर्थ म्हणजेच उच्च-नीच आणि अस्पृश्यता यांचा समाविष्ट आहे. उच्च, नीच आणि अस्पृश्यता. केवळ गाणी किंवा भजनातच नाही तर सार्वजनिक मंचांवर लिहिलेल्या शब्दांचाही आपल्यावर अपेक्षेपेक्षा वेगळा प्रभाव पडतो. झोमॅटोच्या लोकांनाही आता शुद्ध शाकाहारी शब्दाचा वापर कळला आहे. जर शब्दांचा वापर हुशारीने केला तर ते दुःख व आनंद यांच्यातील दुवा बनू शकतात”.

आणखी वाचा – “चित्रपट बघायला आले तर थिएटर बूक करेन कारण…”, ‘स्वातंत्र्य सावरकर’वरुन देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला, म्हणाले, “गरळ ओकतात…”

झोमॅटोचा हा वाढता वाद पाहता त्यांनी हिरव्या गणवेशात डिलिव्हरी करण्याचा निर्णय मागे घेतला होता. तर कंपनीने सांगितले की, झोमॅटोवर शुद्ध शाकाहारी फ्लीट असेल, परंतु ते पूर्वीसारखे लाल गणवेश परिधान करेल.

Tags: twinkle khannaTwinkle Khanna On Zomatozomatozomato food controversy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Kartiki Gaikwad

कार्तिकी गायकवाडला मुलगा होणार की मुलगी?, स्वतःच दिलं उत्तर, येणारं बाळ कोणत्या क्षेत्रात काम करणार तेही ठरवलं, म्हणाली, "बाळाकडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.