टीव्ही अभिनेत्री, ‘बिग बॉस १३’ची स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंह ही काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाच्या कारणावरून चांगलीच चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेकने आरतीच्या लग्नाबाबतची मोठी बातमी शेअर केली होती. यावेळी त्याने खुलासा केला की, आरती तिचा प्रियकर दिपक चौहानसह लग्न करणार असल्याचे सांगितले होते. अशातच आता तिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
अभिनेत्रीने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिने बाल्कनीत उभे राहून छान पोज देत फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची भरजरी साडी नेसली आहे. तसेच हातात बांगड्या व केसात गजरादेखील माळला आहे. तिच्या या लूकमध्यी ती अगदी नवी नवरीसारखी दिसत आहे. त्यामुळे लवकरच आरतीचे लग्न होणार असून आता ती तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करणार आहे.
आरतीने लाल रंगाच्या साडीतील हे खास फोटो शेअर करत त्याखाली ‘लाल ईश्क’ असं म्हटलं आहे. दरम्यान तिने शेअर केलेल्या या फोटोखाली तिच्या अनेक चाहत्यांनी लाईकस व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी या फोटोखाली “खूप छान, खूपच सुंदर, मनमोहक, वाह क्या बात है” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
आरतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत तिने “नवीन सुरुवात” असं म्हटलं आहे. त्यामुळे अभिनेत्री आता कधी विवाहबंधनात अडकणार? याची तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, आरतीचा होणारा नवरा म्हणजेच दीपकबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्टनुसार तो एक व्यवसायिक असल्याचे म्हटले जात आहे.