सध्या सर्वत्र स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळतानाही पाहायला मिळत आहे. हा चित्रपट सर्वत्र हिंदी भाषेतून प्रदर्शित झाल्यानंतर नुकताच या चित्रपटाचा मराठी भाषेतील प्रीमिअर सोहळाही संपन्न झाला. या प्रीमिअरवेळी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी, तसेच राजकीय नेतेही उपस्थित होते. या खास सोहळयाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी माध्यमांसह संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस पक्षाला खोचक टोला लगावलेला पाहायला मिळाला. इतकंच नव्हेतर राहुल गांधी यांना एक ऑफरही केली. (Devendra Fadnavis On Swatantra Veer Savarkar)
चित्रपटाचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी रणदीप हुड्डांचं मनापासून अभिनंदन करेन. त्यांनी सावरकरांवर सत्य सांगणारा चित्रपट आणला. काँग्रेसी आणि डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी सर्वात जास्त अन्याय कोणत्या स्वातंत्र्य सेनानीवर केला असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. परंतु, त्यांची खरी कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप हुड्डांनी आपल्यापर्यंत आणली. शिवाय मराठीतही हा चित्रपट आणला. हा चित्रपट मराठीत प्रदर्शित होत असताना त्या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली यासाठी मी आभारी आहे. मी सर्वांना आवाहन करतो की देशाचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा”.
🕗 8pm | 30-3-2024 📍 Mumbai | रा. ८ वा. | ३०-३-२०२४ 📍 मुंबई .
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 30, 2024
LIVE | Media interaction.#Mumbai #Maharashtra https://t.co/xd4Ye0269w
पुढे ते असं म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकारांचं चरित्र ३६० अंशात आहे. अत्यंत विलक्षण बुद्धीमान व्यक्ती, लिडर आणि नीडर स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, समाजसेवक, जातीप्रथेच्या विरोधात लढणारे सुधारक, मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक, मराठी भाषेला शब्द देणारे साहित्यिक असे अनेक कंगोरे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा दिली त्याबरोबर भारतीय संस्कृती, हिंदुत्व अशा अनेक संकल्पना समाजासमोर आणण्याचाही प्रयत्न केला”. देवेंद्र फडणवीस यांनी रणदीप यांचे कौतुक करत म्हटले, “आजच्या कंमर्शिअल युगात असा चित्रपट बनवण्याची संकल्पना विलक्षण आहे. दोघांनीही या दोन्ही भूमिकांना योग्य न्याय दिला असून आपण त्या कालखंडात पोहोचलो आहोत असं चित्रपट पाहताना नक्कीच वाटलं”.
यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांनादेखील चित्रपटावरुन एक ऑफर केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, “राहुल गांधी हा चित्रपट पाहायला येत असतील तर मी संपूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला हा चित्रपट पाहण्याची व्यवस्था करेन. राहुल गांधींनी सावरकर वाचले नाहीत. म्हणून त्यांना सावरकर कळले नाहीत. त्यामुळे ते सावरकरांविरोधात गरळ ओकत असतात. मी निश्चित रुपाने त्यांना आवाहन करतो की, राहुल गांधींनी सावरकर हा चित्रपट पाहावा. ते चित्रपट पाहू इच्छित असतील तर मी माझ्या खर्चाने त्यांना चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक करेन”, अशी खास ऑफर दिली.