शुद्ध शाकाहारी अन्न वितरणासाठी स्वतंत्र लोक नियुक्त करणार असल्याचं झोमॅटोने जाहीर केले, तेव्हापासून याची चांगलीच चर्चा रंगली. इतकंच नव्हे तर त्यांची डिलिव्हरी टीम हिरवे कपडे परिधान करेल आणि त्यांना शुद्ध शाकाहारी फ्लीट असे म्हटले जाईल. या सुविधेत लोकांना फक्त शुद्ध शाकाहारी पदार्थ विकणाऱ्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करण्याचे स्वातंत्र्य असेल. झोमॅटोच्या या घोषणेवर बराच वाद झाला होता. आता ट्विंकल खन्नाने या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. (Twinkle Khanna On Zomato)
‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेल्या लेखात तिने असे म्हटले आहे की, “झोमॅटोने कदाचित पाहिले असेल की ही एक गरज आहे जी इतर कोणीही पूर्ण करत नाही आणि त्यातून त्यांनी नफा मिळविण्याचा विचार केला असेल. शाकाहारी लोकांच्या विपरीत, शुद्ध शाकाहारींमध्ये जात, भेदभाव आणि अस्पृश्यतेची चिन्हे आहेत”. ट्विंकल खन्ना यांनी लिहिले आहे की, “झोमॅटोच्या लोकांनी तेच केले जे यशस्वी उद्योजक करण्यासाठी ओळखले जातात. अशी गरज पहा जी इतर कोणीही पूर्ण करत नाही, ती सेवा प्रदान करा आणि नफा मिळवा. अन्नाची शुद्ध आणि अशुद्ध अशी विभागणी केली जाते आणि वितरणासाठी एक टीम तयार केली जाते, ज्यांना हिरवे कपडे घालावे लागतात”.
ट्विंकल खन्ना म्हणाली, “हे पाहता, असे दिसते की, हा निर्णय अशा लोकांसाठी उपाय आहे ज्यांना विशिष्ट प्रकारचे अन्न आवश्यक आहे, परंतु प्रत्यक्षात ते हे विसरले की शाकाहारी आणि मांसाहारी यापेक्षा वेगळे, शुद्ध शाकाहारीमध्ये जातीचा अर्थ म्हणजेच उच्च-नीच आणि अस्पृश्यता यांचा समाविष्ट आहे. उच्च, नीच आणि अस्पृश्यता. केवळ गाणी किंवा भजनातच नाही तर सार्वजनिक मंचांवर लिहिलेल्या शब्दांचाही आपल्यावर अपेक्षेपेक्षा वेगळा प्रभाव पडतो. झोमॅटोच्या लोकांनाही आता शुद्ध शाकाहारी शब्दाचा वापर कळला आहे. जर शब्दांचा वापर हुशारीने केला तर ते दुःख व आनंद यांच्यातील दुवा बनू शकतात”.
झोमॅटोचा हा वाढता वाद पाहता त्यांनी हिरव्या गणवेशात डिलिव्हरी करण्याचा निर्णय मागे घेतला होता. तर कंपनीने सांगितले की, झोमॅटोवर शुद्ध शाकाहारी फ्लीट असेल, परंतु ते पूर्वीसारखे लाल गणवेश परिधान करेल.