Twinkle Khanna Wearing Hair Accessories : अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना MAMI येथे नुकतेच स्पॉट झाले. डिंपल कपाडियाचा ‘दो नोनी गो’ हा चित्रपट MAMI येथे प्रदर्शित झाला होता. या खास प्रसंगी ट्विंकलने तिच्या केसांना काहीतरी लावले होते, तिची ही नवी हेअरस्टाईल पाहून लोक तिची खिल्ली उडवत आहेत. ट्विंकल खन्नाचा हा लूक सध्या चर्चेत आला असून अनेकजण अभिनेत्रीला ट्रोल करताना दिसत आहेत. अक्षयसह यावेळी ट्विंकल पापराजींना पोज देताना दिसली. यावेळी ट्विंकलचा हा लूक चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी कमेंट करत ट्विंकलला ट्रोल केलेलं पाहायला मिळालं.
ट्विंकलचा लूक पाहून नेटकरी अनेक कमेंट करत आहेत. यावेळी ट्विंकल साडी नेसून आलेली दिसली यावेळी तिने हटके आणि युनिक हेअरस्टाईल केलेली पाहायला मिळाली. ते पाहून अनेकांनी तिला धारेवर धरलं आहे. ट्विंकलची हेअरस्टाईल पाहून नेटकरी म्हणाले, “ती केसात प्लेट्स घालून का आली आहे?”. ट्विंकल खन्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन पती अक्षय कुमारबरोबर पोज देताना दिसत आहे. पण सगळ्यात जास्त लक्ष तिच्या केसांकडे जातं.
एका यूजरने लिहिले आहे की, “ती राणीसारखी का फिरत आहे?”. तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, “हे कसलं ब्रेड-बेकर डोक्यावर ठेवले आहे?”, “हे लावले तर आयुष्य झिंगाला ला ला”, असं म्हणत ट्विंकलला ट्रोल करत आहेत. मुलीबरोबरच आईचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिंपल कपाडियाने ज्युनियर्सबरोबर क्लिक केलेले फोटो मिळत नाहीत, त्यामुळे ज्युनियर्सबरोबर फोटो काढणार नाही असं त्यांनी म्हटलं, त्यांचं हे वाक्यही चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – सलमान खानकडून ५ कोटींची खंडणी मागणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात, जमशेदपूरमधून भाजी विक्रेत्याला अटक
ट्विंकल खन्ना एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे. १९९५ मध्ये ‘बरसात’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. ती ‘इंटरनॅशनल खिलाडी’, ‘बादशाह’, ‘मेला’ आणि ‘जोडी नंबर वन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. २००१ मधला ‘लव के लिए कुछ भी करेगा’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. यानंतर ती चित्रपटांपासून दुरावली. २००१ मध्ये अक्षय व ट्विंकलचे लग्न झाले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत.