Paaru Marathi Serial Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. ही मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेतील कलाकार मंडळीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. सध्या पारू भोवती मालिकेचं कथानक फिरताना दिसत आहे. तर पारू व आदित्य यांचे सूर मालिकेत जुळताना दिसत आहेत. त्यामुळे मालिकेला एक वेगळंच रंजक वळण येणार असल्याची चाहूल लागून राहिली आहे. पारू व आदित्य नकळतपणे एकमेकांच्या जवळ येत असल्याचं मालिकेत पहायला मिळत आहे.
अशातच ‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत पेजवरुन पारू मालिकेतील जोडीचा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पारू व आदित्य यांची रोमँटिक केमिस्ट्री या गाण्यातून पाहायला मिळत आहे. संपूर्ण गाणं अदयाप प्रदर्शित झालं नसलं तरी या गाण्याची छोटीशी झलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. गावाकडे चित्रित केलेल्या या गाण्यात पारू व आदित्य यांचं प्रेम पाहायला मिळत आहे. आता गाण्यातील हे चित्रीकरण खऱ्या त्यांच्या खऱ्या आयुष्यातही त्यांचं हे नातं दाखवणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
आदित्य व पारुच्या भावना सूरांतून मांडणारं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आदित्य व पारू यांची केमिस्ट्री मालिकेत सुरु होताना पाहायला मिळत आहे. ऍड शूटदरम्यान पारू व आदित्यच लग्न झालं हे लग्न पारूने खरं मानलं. शिवाय आदित्यच्या नावाचं मंगळसूत्रही तिने अजूनही गळ्यात ठेवलं आहे. पारूने हे मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे आदित्यच्या जीवावर बेतलं. त्यामुळे आता नियतीने त्यांची ही गाठ बांधली आहे.
आणखी वाचा – “केसात स्टीलची प्लेट का?”, अक्षय कुमारच्या बायकोची हेअरस्टाइल पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, असं का केलं?
तसेच पारू व आदित्य यांच्यातील नात्याची अहिल्यादेवींनाही चाहूल लागली आहे. इतकंच नव्हे तर दामिनीलाही पारू व आदित्यवर शंका आली असून मालिकेच्या पुढील भागात ती याचं खरं खोटं करणार आहे. त्यामुळे पारू व आदित्य यांचा अहिल्यादेवींसमोर पर्दाफाश होणार आहे. आता अहिल्यादेवींना पारू व आदित्यच्या नात्याबद्दल कळल्यावर ते पारूला सून म्हणून स्वीकारणार का हे पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.