अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नातवांचा आणि आजी-आजोबांचा संबंध काही प्रमाणात कमी झाला असल्याचे पाहायला मिळतं. पण या सर्वाला एक अपवाद आहे सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुली आणि ही सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही तिच्या अभिनयाने कायमच चर्चेत राहत असते. मात्र अभिनेत्री तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. क्रांती व तिच्या मुलींचे रिल्स तर सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत. क्रांतीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण तिच्या मुलींच्या जन्मानंतर क्रांतीने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी ती सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असते. (Kranti Redkar Daughters Grandpa Chat)
क्रांती आपल्या लेकींचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. क्रांती आपल्या अनोख्या शैलीतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओ प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसादही मिळतो. अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे लेकीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिची मुलगी आपल्या आजोबांबरोबर मनमुराद गप्पा मारत आहे. नात आणि आजोबांच्या या गोड संभाषणाचा व्हिडीओ क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये क्रांतीची लेक आजोबांना काहीतरी सांगत आहे आणि क्रांतीचे आजोबाही नातीचं म्हणणं अगदी लक्ष देऊन ऐकत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ फारच लक्षवेधी आहे. क्रांतीने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “गोदो प्रत्येक वीकेंडला तिच्या आजोबांना आठडव्याचे पूर्ण अपडेट देते. शाळेत हा प्रकार घडला, शिक्षिकेने हे केलं. एखादा मित्राने ते केलं. ती शाळेत काय काय शिकली. मम्मी तिला किती ओरडली. आजोबा हे छबिल गोदो यांचे चांगले मित्र आहेत. हे एकमेव व्यक्ती आहे जो कधीही दोघींना जज करत नाहीत”.
क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “किती गोड, खूप छान”, “मला पण माझ्या आजोबांची आठवण आली” अशा अनेक प्रकारच्या कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे