शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपतीवर जीवापाड प्रेम करते त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी, वाढदिवसानिमित्त शेअर केली रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “तुझ्यासाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 8, 2024 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hrishikesh Shelar Birthday

अधिपतीवर जीवापाड प्रेम करते त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी, वाढदिवसानिमित्त शेअर केली रोमँटिक पोस्ट, म्हणाली, "तुझ्यासाठी…"

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील अक्षरा व अधिपती यांच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. सध्या मालिकाविश्वात ही जोडी चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेत अक्षराच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसत आहे. तर अधिपतीच्या भूमिकेत हृषीकेश शेलार दिसत आहे. अधिपती या भूमिकेमुळे हृषीकेश शेलारला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. आज प्रेक्षकांच्या लाडक्या अधिपतीचा म्हणजेच हृषीकेशचा वाढदिवस आहे. (Hrishikesh Shelar Birthday)

हृषीकेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने म्हणजेच स्नेहा काटेने त्याच्यासाठी शेअर केलेल्या खास पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावर हृषीकेश व स्नेहा बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच दोघेही काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त स्नेहाने शेअर केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यावेळी स्नेहाने खास कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. शिवाय त्यांच्या गोड अशा लेकीबरोबरचे फोटोही पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा – अमोलसाठी अर्जुन-अप्पी येणार का एकत्र?, तर दोघांना वेगळा करायचा आर्याचा नवा प्लॅन होणार का यशस्वी?

View this post on Instagram

A post shared by Sneha Ashok Mangal(KATE) (@sneha_ashokmangal14)

ही पोस्ट शेअर करत तिने, “हे पार्टनर. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू ज्या आनंदासाठी पात्र आहेस अशा सर्व शुभेच्छा आणि हे वर्ष तुझ्यासाठी आणखी यश व संधी घेऊन येवो. खूप प्रेम”, असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. स्नेहाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हृषीकेश नेहमीच त्याच्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतो. हृषीकेश व स्नेहाच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत. हृषीकेशच्या पत्नीचे नाव स्नेहा काटे शेलार असे आहे.

आणखी वाचा – ‘तुला शिकवीन…’ फेम मास्तरीण बाईंची अधिपतीच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट, म्हणाली, “तुझी मेहनत व चांगुलपणा…”

हृषिकेशची पत्नी स्नेहा ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. दोघांच्या लग्नाचीही बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली. दोघांनी अत्यंत साधेपणाने लग्नसोहळा उरकला. पारंपरिक अंदाजात ही जोडी विवाहबंधनात अडकली. गेल्यावर्षी ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. हृषीकेश व स्नेहाने मागील वर्षी चाहत्यांशी गुडन्यूज शेअर केली. दोघांनी आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली. त्यांच्या लेकीचं नाव रुही असे आहे.

Tags: hrishikesh shelarHrishikesh Shelar Birthdaymarathi actorTula shikvin Changalach Dhada
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
Aishwarya Narkar celebrated Avinash Narkar's birthday and shared a special post for him.

नवऱ्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, ऐश्वर्या नारकरांनी अविनाश यांना केकही भरवला अन्...; फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.