मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते म्हणजे अविनाश नारकर. १९९४ साली ‘मुक्ता’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या नाटक व चित्रपटांमधून काम केले. त्यांच्या सर्व भूमिका प्रचंड गाजल्या. चित्रपटांबरोबर त्यांनी अनेक नाटके व मालिकांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या जोडीपैकी एक जोडी आहे. अशातच आज अविनाश नारकरांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्नी ऐश्वर्या नारकरांनी त्यांना इन्स्टाग्रामद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
ऐश्वर्या व अविनाश हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. दोघे एकमेकांबरोबरचे डान्स व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांचे हे व्हिडीओ चाहत्यांच्यादेखील विशेष पसंतीस पडतात. अहस्तच ऐश्वर्या यांनी त्यांच्या पतीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अविनाश नारकरांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या अविनाश यांना केक भरवत आहेत आणि हाच खास फोटो शेअर करत त्यांनी अविनाश यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी तुमच्यावर अनंत आणि त्याहीपलीकडे प्रेम करते. तुमच्यावर कायम आशीर्वाद असो” असं म्हणत ऐश्वर्या यांनी पतीसाठी वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकर हे कपल त्यांनी केलेल्या रिल्समुळे बरेच चर्चेत असतं. अभिनय क्षेत्रातदेखील या जोडप्याने त्यांच्या कामाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण अभिनयाबरोबरच त्यांनी खऱ्या आयुष्यातही त्यांच नातं तितकचं जपलं मनापासून जपल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अविनाश नारकरह हे कन्यादान या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. तर ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या रुपाली ही नकारात्मक भूमिका साकारत असून त्यांची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडते.





