‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील अक्षरा व अधिपती यांच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. सध्या मालिकाविश्वात ही जोडी चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेत अक्षराच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसत आहे. तर अधिपतीच्या भूमिकेत हृषीकेश शेलार दिसत आहे. अधिपती या भूमिकेमुळे हृषीकेश शेलारला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. आज प्रेक्षकांच्या लाडक्या अधिपतीचा म्हणजेच हृषीकेशचा वाढदिवस आहे. (Hrishikesh Shelar Birthday)
हृषीकेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने म्हणजेच स्नेहा काटेने त्याच्यासाठी शेअर केलेल्या खास पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावर हृषीकेश व स्नेहा बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच दोघेही काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त स्नेहाने शेअर केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यावेळी स्नेहाने खास कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. शिवाय त्यांच्या गोड अशा लेकीबरोबरचे फोटोही पोस्ट केले आहेत.
ही पोस्ट शेअर करत तिने, “हे पार्टनर. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू ज्या आनंदासाठी पात्र आहेस अशा सर्व शुभेच्छा आणि हे वर्ष तुझ्यासाठी आणखी यश व संधी घेऊन येवो. खूप प्रेम”, असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. स्नेहाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हृषीकेश नेहमीच त्याच्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतो. हृषीकेश व स्नेहाच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत. हृषीकेशच्या पत्नीचे नाव स्नेहा काटे शेलार असे आहे.
हृषिकेशची पत्नी स्नेहा ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. दोघांच्या लग्नाचीही बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली. दोघांनी अत्यंत साधेपणाने लग्नसोहळा उरकला. पारंपरिक अंदाजात ही जोडी विवाहबंधनात अडकली. गेल्यावर्षी ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. हृषीकेश व स्नेहाने मागील वर्षी चाहत्यांशी गुडन्यूज शेअर केली. दोघांनी आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी दिली. त्यांच्या लेकीचं नाव रुही असे आहे.