‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मालिकेत अक्षरा अधिपतीच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत मध्यंतरी आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका बरेचदा ट्रोल झाली. मात्र आता पुन्हा एकदा अक्षरा व अधिपती यांचा प्रेमाचा प्रवास सुरु झाल्याने ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. मालिकेच्या एकामागे एक येणाऱ्या रंजक वळणांनी मालिकेची उत्सुकता अधिकच वाढवून ठेवली आहे. तर मालिकेत एकीकडे भुवनेश्वरी हे नकारात्मक पात्रही विशेष चर्चेत आहे. (Tula shikvin changlach dhada promo)
भुवनेश्वरी हे पात्र अभिनेत्री कविता लाड साकारत आहेत. नकारात्मक भूमिकेत असलेल्या या पात्राला मात्र सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात आहे. भुवनेश्वरी यांनी पहिल्या दिवसापासून अक्षराचा रागराग केला. अक्षराबद्दल मनात राग ठेवून त्या मालिकेत वावरताना दिसत आहेत. त्यामुळे अक्षरा कशी वर जाणार नाही याकडे भुवनेश्वरीच बारीक लक्ष असलेले पाहायला मिळालं. अक्षराचा शिक्षणाकडे असलेला कल पाहता ती आपल्यापेक्षा वरचढ ठरू शकते. या भीतीने भुवनेश्वरीने कायमच अक्षराला शिक्षणापासून दूर ठेवलं. मात्र अक्षराने ही लढाई स्वतः पार करत तिची शिकवण्याची आवड जोपासली.
इतकंच नव्हेतर अधिपतीच्या मनातही भुवनेश्वरीने अक्षराबद्दल राग घालून दिला. मात्र अक्षराने अधिपतीचेही मन जिंकलं. अशातच सध्या मालिकेत एका स्पर्धेचं चित्रीकरण सुरु असलेल पाहायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी भुवनेश्वरीने अक्षराचे नाव दिलेलं पाहायला मिळतं आहे. तर दुर्गेश्वरीने चंचलाच नाव दिलं आहे. अक्षरा व चंचला दोघींमध्ये आता चुरशीची लढत होणार असल्याच पाहायला मिळत आहे. अशातच एका प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
या प्रोमोमध्ये अक्षरा स्पर्धेत सर्वांसमोर सांगते की, आता भुवनेश्वरी मॅडमचा सत्कार करावा. तितक्यात काही महिला आतमध्ये येतात आणि म्हणतात, “कोणाचा सत्कार करावा. या काय आदर्श पत्नी आहेत का?, शिक्षणाला नाव ठेवायची. शाळा आहे की दुकानदार. आम्ही यांचा कसा सत्कार करतो ना ते बघाच तुम्ही”, असं म्हणत त्या महिलांपैकी एक बाई भुवनेश्वरी यांच्यावर चप्पल फेकून मारते. तितक्यात स्टेजवर उभी असलेली अक्षरा ती फेकलेली चप्पल पकडते. हे पाहून भुवनेश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. भुवनेश्वरी अक्षराबरोबर वाईट वागत असली तरी भुवनेश्वरीबरोबर वाईट होताना अक्षराला पाहवत नाही आणि अक्षरा ती चप्पल अडवते. अक्षरा भुवनेश्वरीची बाजू घेत काय बोलणार?, त्या महिलांपासून भुवनेश्वरीचा कसा बचाव करणार?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल. दरम्यान प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी अक्षराच कौतुक केलेल पाहायला मिळत आहे.