मराठी विनोदी विश्वातील एक लोकप्रिय व सुप्रसिद्ध नाव म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या काही विनोदी कार्यक्रमांतून अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार घराघरांत पोहोचल्या. विनोदी भूमिकांसह त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरानंजन केले आहे. विशाखा यांनी केवळ पोट धरुन हसवणारी विनोदी भूमिकेसह, राग व चीड येईल अशी खलनायिकाही त्या उत्तमरित्या निभावत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत त्या साकारत असलेल्या ‘रागिणी’
या मालिकेत विशाखा यांनी रागिणी भूमिकेतून एका स्वार्थी व कटकारस्थान करणाऱ्या आईची भूमिका साकारली आहे. याच मालिकेच्या निमित्ताने विशाखा यांनी ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्यांना “मालिकेत ज्याप्रमाणे तुम्हाला मुलगा आणि सून आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला खऱ्या आयुष्यातही एक मुलगा आहे. तर तुमच्या होणाऱ्या सूनेकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्या म्हणाल्या, “खरंतर कलाकार झाल्यानंतर संसारासाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी सून म्हणून मी खूप कमी पडले आहे. तर होणाऱ्या सूनेकडून मी काय अपेक्षा करु?”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “फक्त मी तिला एवढच सांगेन की, तू तुझ्या नवऱ्याची म्हणजेच माझ्या लेकाची चांगली काळजी घे. बाकी माझी तशी काही इच्छा नाही. मुळात असं असतं की, एका विशिष्ट काळानंतर, आपल्या घरातील सगळा कारभार आपण आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे, त्यामुळे आपल्या डोक्याला त्रास कमी होतो. तर मी ही तेच करणार आहे. याशिवाय तिचं आणि माझं नातं चांगलं होण्यासाठी जे काही करता येईल ते मी निश्चित करेन.” ]
दरम्यान, ‘फु बाई फु’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा अनेक विनोदी कार्यक्रमातून विशाखा सुभेदार यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांतदेखील काही भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय आता त्या स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ मालिकेतील रागिणी या भूमिकेतून खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.
.