मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझं लग्न झाल्यानंतर…”, कायमची मुंबई सोडून सासू-सासऱ्यांबरोबर अलिबागमध्ये राहते प्रार्थना बेहेरे, म्हणाली, “माझ्या नवऱ्याने…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 16, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prarthana Behere talked about her mother and father in law see the details

"माझं लग्न झाल्यानंतर...", कायमची मुंबई सोडून सासू-सासऱ्यांबरोबर अलिबागमध्ये राहते प्रार्थना बेहेरे, म्हणाली, "माझ्या नवऱ्याने..."

हिंदी कलाविश्वातून छोट्या पडद्यावर हिंदी प्रेक्षकांबरोबर ‘पवित्र रीश्ता’ निर्माण करत मनोरंजन सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी गोड, सोज्वळ व सुंदर अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. त्याचबरोबर तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे मराठी प्रेक्षकांचेदेखील चांगलेच मनोरंजन केले. या मालिकेतील तिच्या नेहा या पात्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली. छोट्या पडद्याबरोबरच तिने ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा अनेक चित्रपटांद्वारे सिनेमाचा मोठा पडदाही गाजवला.

अशाप्रकारे मालिका व चित्रपटांद्वारे तिने अल्पावधीतच स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रार्थनाने २०१७ मध्ये अभिनेत्रीने अभिषेक जावकरशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींकडून या क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी पाठिंबा कसा मिळाला याविषयी प्रार्थनाने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केले आहे. प्रार्थना आता मुंबई सोडून  कायमची अलिबागमध्ये स्थायिक झाली आहे. तिथे त्यांचं मोठं फार्महाऊस असून त्यात घोडे व इतर प्राणीदेखील आहेत, ज्यांची प्रार्थना व तिचा नवरा काळजी घेतात.

View this post on Instagram

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

आणखी वाचा – “संसारात सून म्हणून कमी पडले आणि…”, विशाखा सुभेदारांनी बोलून दाखवली ‘ती’ खंत, म्हणाल्या, “माझ्या सासूबाईंसाठी…”

सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात तिने याविषयी आपले मत मांडले आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, “माझं लग्न झाल्यानंतर मी ३ वर्षे काम करणं बंद केलं होतं. मी तेव्हा खूप जास्त काम करत नव्हते. वर्षातून एखादं दुसरा चित्रपट करत होते. कारण मला तेव्हा माझ्या सासू-सासऱ्यांना आणि माझ्या नवऱ्याला वेळ द्यायचा होता. त्यामुळे मी फार काम करत नव्हते. अगदीच मोजकं काम करत होते. तर तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या तू काम का करत नाहीस. अशी घरी का बसून आहेस, तुझ्यात टॅलेंट आहे तर तू काम केलं पाहिजे.”

आणखी वाचा – अक्षराने जिंकलं भुवनेश्वरीचं मन, आता तरी करेल का तिचा सून म्हणून स्वीकार?, प्रोमो पाहून नेटकऱ्यांनीही केलं कौतुक, म्हणाले…

यापुढे प्रार्थनाने असं म्हटलं की, “‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा पहिला दिवस होता तेव्हा माझ्या नवऱ्याने मला एक भलामोठा मॅसेज केला होता आणि त्यात लिहिलं होतं की, मी फक्त कॅमेऱ्यावर काम करण्यासाठी बनली आहेस. मी तुझ्याशी यासाठी लग्न नाही केलं की तू प्रार्थना बेहेरे आहेस किंवा तू फक्त माझी बायको बनून घरी बसावी. मी तुझाशी लग्न केले कारण तुझ्यात टॅलेंट आहे आणि तू कॅमेऱ्यासाठी बनली आहेस्. त्यामुळे तू कायम काम करत राहशील हे लक्षात ठेव.”

Tags: marathi actressprarthana behere
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Heena Khan Health Update

तब्बल १६ तास शूटिंग, जेवणाकडेही दुर्लक्ष अन्…; 'या' अभिनेत्रीची प्रकृती खालावली, म्हणाली, "मला श्वास घ्यायलाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.