‘पारू’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. एका मागोमाग एक मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत पारूवर ओढवलेलं संकट आता दूर झालेल पाहायला मिळत आहे. मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागामध्ये असं पाहायला मिळालं की, आदित्यने अजयच्या तावडीतून पारूची सुखरूप सुटका केलेली आहे. मात्र पारू अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नसते. तर एकीकडे प्रीतम आदित्यवर चिडतो की तू त्या अजयला जाऊ का दिलं?, त्याला चांगलीच अद्दल शिकवायला हवी होती. (Paaru Serial Update)
प्रीतमचं हे रूप पाहून आदित्यलाही धक्का बसतो. आदित्य म्हणतो की, यापूर्वी तू असा कधीही वागला नव्हतास. तू इतकी पारूची काळजी का करत आहेस?, यावर आदित्यला प्रीतम सांगतो की, आमची नितळ मैत्री आहे आणि पारू माझी एक प्रामाणिक मैत्रीण आहे. ती आल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले. प्रीतम बोलतो, पारूने आईप्रमाणे माझ्या चुका पाठीशी घातल्या, वडिलांप्रमाणे ती माझ्यावर रागावते आणि मोठ्या भावाप्रमाणे तिने माझ्या दोन कानाखाली मारल्या तरी चालतील.
प्रीतमच हे बोलणं ऐकून आदित्यला त्यांच्या मैत्रीचं फारच कौतुक वाटतं. तर एकीकडे पारू तिच्या वडिलांबरोबर वेळ घालवत असते. वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपलेली असते. तितक्यात तिथं अहिल्यादेवी किर्लोस्कर येतात. त्यानंतर आता मालिकेच्या आजच्या भागात अहिल्यादेवी आणि पारू यांचा संवाद पाहायला मिळणार आहे. अहिल्यादेवी पारुला म्हणतात, तुला जे काही बोलायचं आहे ते तू माझ्याशी बोलू शकतेस. यावर पारू म्हणते की, मी माझ्या वडिलांसमोर रडू शकत नाही. जर आज माझी आज आई असती तर मी तिचा पदर घेऊन ढसाढसा रडले असते.
पारूचं बोलणं ऐकून अहिल्यादेवी स्वतःचा पदर पारू समोर करतात. अहिल्यादेवी पारूच्या डोक्यावर मायेचा पदर ठेवतात. अहिल्यादेवींनी पारूचा लेक म्हणून स्वीकार करणार का?, पारू अहिल्यादेवी समोर आपलं मन मोकळ करणार का?, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.