‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अक्षरा व अधिपती यांच्यातील वाद कमी होताना पाहायला मिळत आहे. तर अक्षराही अधिपतीच्या घरी राहायला आलेली आहे. तर एकीकडे अक्षरा अधिपतीच्या घरी आल्यानंतर भुवनेश्वरी खूप खुश असते. भुवनेश्वरी आता अक्षराचा सूड उगवण्यासाठी तयारी करत असते. मात्र आता भुवनेश्वरीचा प्रत्येक डाव अक्षरा ओळखून असते. तीदेखील आता तिला यावर उत्तर देण्यासाठी तयार असते. (Tula shikvin Changalach Dhada Serial Promo)
नुकताच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अक्षरा व भुवनेश्वरी समोरासमोर आलेल्या दिसत आहेत. या प्रोमोमध्ये भुवनेश्वरी असं बोलताना दिसत आहे की, “आता लय झाले छोटे छोटे वार, आता आम्ही मोठा वार करणार”. हे एकूण अक्षरा बोलताना दिसते की, “आता मी तुमची प्रत्येक चाल हाणून पाडणार. तुमच्या शहला काठशह देणार. कारण आता लढाई समोरासमोर होणार”, असं बोलताना दिसत आहे.
हा प्रोमो पाहून प्रेक्षकांचा मालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत असे सीन दाखवण्याकडे भर देण्याचा सल्ला दिला आहे. एका नेटकाऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “भारीच ,खरं तर हे खूप आधीच अपेक्षित होत पण ठीक आहे. आता असेच ट्रॅक कायम ठेवा फार मजा येईल आणि टीआरपी ही वाढेल”, असं म्हटलं आहे.
तर एकाने या प्रोमोवर कमेंट करत असं म्हटलं आहे की, “प्रोमोमध्ये किती मस्त शॉट दाखवला आहे. सीनचा खूप मस्त फील येत आहे”. तर एका चाहत्याने, “अक्षरा-अधिपती यांचं प्रेम दाखवा”, असं म्हटलं आहे. आता मालिकेच्या या प्रोमोने मालिकेत नेमकं काय होणार याची उत्सुकता वाढविली आहे.