टीआरपीच्या शर्यतीत सध्या स्टार प्रवाह वहिनी अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही प्रथम क्रमांकावर आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहे. सागर-मुक्ता यांच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर एकीकडे सावनीचे या प्रेमाच्या गोष्टीत विष कालवण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. आदित्यचा वापर करुन सावनी मुक्ता-सागरमध्ये फूट पाडते. (Premachi Goshta Promo)
मालिकेत नुकतीच होळी, रंगपंचमी थाटामाटात साजरी करण्यात आली. होळीच्या दिवशी सागर मुक्ताला सगळ्यांसमोर प्रपोज करतो. दरम्यान हे सर्वकाही सावनी लांबून पाहत असते. मुक्ता व सागर यांच्यातील जवळीक सावनीला खटकते. त्यानंतर सावनी सागरबाबत आदित्यचे कान भरते. त्यांनतर सागर आदित्यला होळीच्या शुभेच्छा द्यायला येतो, तेव्हा आदित्य सागरावर चिडतो आणि बोलतो, “तुमच्यासाठी महत्त्वाची ती तुमची नवीन बायको आहे”.
आदित्यचं बोलणं ऐकून सागर आदित्यला समजावण्याचा प्रयत्न करतो. सागर आदित्यला म्हणतो, “माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस. माझं मुक्तावर अजिबात प्रेम नाही”. हे सर्व मुक्ता ऐकते आणि सागरच्या सणसणीत कानशिलात लगावते. त्यानंतर सागर मुक्ताला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो. पण मुक्ता काही ऐकत नाही. मुक्ता-सागरमधलं भांडणं पाहून सावनीला खूप आनंद होतो.
अशातच आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, सागर हात जोडून मुक्ताची माफी मागताना दिसत आहे. पण मुक्ता काहीच बोलत नाही. शेवटी सागर गुडघ्यावर बसून कान पकडून मुक्ताची माफी मागतो. “मला प्लीज माफ करा, आपण नव्याने सुरुवात करुया?”, असं बोलून तो मुक्तासाठी हात पुढे करतो. पण तरीही मुक्ता काही सागरला माफ करत नाही. आता मुक्ता व सागर यांच्यातील प्रेम पुन्हा बहरणार का? मुक्ता सागरला माफ करणार का? हे पाहून रंजक ठरणार आहे.