मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

AJ-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात ‘अप्सरा’ची हवा, सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 27, 2024 | 4:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial Sonali Kulkarni danced in AJ and Leela's mehndi ceremony.

AJ-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात ‘अप्सरा’ची हवा, सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेला प्रेक्षकांकडूनहे चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत नुकताच AJ म्हणजेच (अभिराम जहागीरदार) आणि लीला यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. हो, नाही म्हणता म्हणता लवकरच आता हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अलीकडेच त्यांचा साखरपुडा पार पडला होता. यानंतर आता मेहंदी सोहळा रंगणार असून मराठी मनोरंजन विश्वातील ‘अस्परा’ही या सोहळ्याला खास हजेरी लावणार आहे.

AJ व लीलाच्या मेहंदी सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खास परफॉर्मन्स करणार आहे. याचा व्हिडीओ ‘इट्स मज्जा’ या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. यावेळी सोनालीने तिच्याच ‘मितवा’ या चित्रपटातील ‘सावर रे’ गाण्यावर खास सादरीकरण केले. तिच्या या सादरीकरणाने चाहत्यांसह उपस्थितांचीदेखील मनं जिंकली आहेत. या व्हिडीओत, सोनाली राखडी रंगाच्या लेहंग्यात पाहायला मिळत आहे. सध्या सोनालीच्या या डान्स परफॉर्मन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “विरोचक की तात्याविंचू”, ‘सातव्या मुलीची…’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, “त्रिनयना देवी सध्या…”

‘झी मराठी’ वाहिनीवर १८ मार्चपासून ‘नवरी मिळे हिटलरला’ नवी मालिका सुरू झाली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापटने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व वल्लरी विराजने साकारलेली लीला या दोघांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं आहे. दोघांची जोडी चांगली हिट झाली आहे. आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

आणखी वाचा – Video : ‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंग दिल्ली विमानतळावरुन बेपत्ता झाल्यानंतर CCTV फुटेज समोर, फिरताना दिसला अन्…; नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत राकेश बापट व वल्लरी विराजव्यतिरिक्त शर्मिला शिंदे, माधुरी भरती, सानिका काशीकर, भूमिजा पाटील, भारती पाटील, शीतल क्षीरसागर, उदय साळवी, आलापिनी निसळ, मिलिंद शिरोळे, राज मोरे, असे अनेक कलाकार मंडळीत आहेत. सध्या या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे

Tags: marathi entertainment newsNavri Mile Hitlerlasonalee kulkarni
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Ka Re Durava fame actress Archana Nipankar what does right now

गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, अभिनयक्षेत्रामधूनही गायब अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.