‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिकाही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण अप्पी व अर्जुन दोघेही आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार आहेत. अप्पीची कलेक्टर म्हणून उत्तराखंडला बदली झालेली असल्याचे पाहायला मिळाले. अर्जुनला ही गोष्ट समजते तेव्हा आईबद्दल गोष्टी लपवल्यामुळे तो राग मनात ठेवत अप्पीबरोबर न जाता तिथेच राहणं पसंत करतो.
अप्पी-अर्जुनच्या आयुष्यात या बदलीमुळे मोठं वळण आलेलं पाहायला मिळणार आहे. अशातच या मालिकेचा एक नवीन प्रोमो आला असून या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नवीन प्रोमोमध्ये अप्पी उत्तराखंडला तिचं कर्तव्य बजावताना दिसत आहे. त्याचबरोबर तिचा लेकही मोठा झालेला मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत तब्बल सात वर्षांचा लीप पाहायला मिळणार आहे. या नवीन प्रोमोखाली अनेकांनी कमेंट्सद्वारे या मालिकेच्या नवीन प्रोमोबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.


आणखी वाचा – AJ-लीलाच्या मेहंदी सोहळ्यात ‘अप्सरा’ची हवा, सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी “अप्पी खूप भारी दिसत आहे आणि अर्जुन आता इन्सपेक्टर दिसत आहे, आता दोघे मालिकेसाठी परफेक्ट शोभत आहेत, एकदम भारी दिसत आहेत, आता खरी कलेक्टर वाटते अप्पी , मालिकेला खूपच छान वळण आलं आहे, आम्ही अप्पीच्या या खास लूकची वाट पाहत आहोत, आता दोघेही छान दिसत आहेत, अप्पी खूप सुंदर दिसत आहे” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, अभिनयक्षेत्रामधूनही गायब अन्…
दरम्यान, या आगामी भागामध्ये अप्पीच्या मुलाची भूमिका साकारणारा बालकलाकार हा साईराज केंद्रे साकारणार आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’, हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. या गाण्यात ज्या मुलाने भूमिका केली होती, तो आता या मालिकेद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. या गाण्यानंतर आता साईराज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.