शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changalach Dhada मालिकेत भुवनेश्वरीची एन्ट्री, अक्षराला सासूबाई दिसली अन्…; नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 2, 2024 | 6:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changalach Dhada Marathi serial update Bhuvaneshwari's entry new promo viral on social media

Tula Shikvin Changalach Dhada मालिकेत भुवनेश्वरीची होणार एन्ट्री, नवीन प्रोमो समोर

काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका.  या मालिकेत येणाऱ्या अनेक नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. अक्षरा-अधिपती हनिमूनला गेलेले असताना चारुहास भुवनेश्वरीला घराबाहेर काढतो. घरी पुन्हा आल्यावर अधिपतीला त्याची आई कुठेच दिसत नाही. त्यामुळे तो प्रचंड बैचेन होतो. सगळेजण भुवनेश्वरीचा शोध घेऊ लागतात. अशातच बाजारात एकेदिवशी अक्षराला चारुलता (अधिपतीची खरी आई) दिसते. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Update)

चारुलताने सूर्यवंशांच्या घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. एकीकडे अधिपती चारुलताला स्वीकारण्यास तयार नाही पण दुसरीकडे अक्षरा मात्र त्या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे. मालिकेच्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या प्रोमोमध्ये चारुलता व भुवनेश्वरी एका मुखवट्यामागून अक्षराला त्या चारुलता व भुवनेश्वरी असल्याचे सांगतात. यामुळे अक्षरा संभ्रमात पडते. अक्षराच्या मनात संभ्रम निर्माण होत असतानाच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – The Great Indian Kapil Show वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी, नेमकं प्रकरण काय?

अशातच नुकताच प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बाजारात गेलेल्या अक्षराला भुवनेश्वरीची पाठमोरी झलक दिसते. नऊवारी साडी, अंगावर शाल, केसात गजरा, भरजरी दागिने, हातात सोन्याच्या अंगठ्या असा सासूचा भुवनेश्वरीचा लूक अक्षराला दिसतो. पण ती जवळ जाताच भुवनेश्वरी अचानक गायब होते. या प्रोमोमुळे आता पुन्हा एकदा मालिकेत भुवनेश्वरी दिसणार असल्याचं निश्चित झालं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम डीपीने बायकोच्या ‘या’ प्रश्नावर केलं होतं लग्न, सांगितली हटके लव्हस्टोरी, म्हणाला, “मी बघितलेली पहिलीच मुलगी…”

दरम्यान, मालिकेच्या या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरी गायब आहे. ती गायब झाल्यानंतर चारुलताची एन्ट्री झाली आहे. अक्षरा तिची भेट घेण्यात यशस्वी होणार का? ही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. मालिकेत भुवनेश्वरीची एन्ट्री ६ नोव्हेंबरच्या भागात होणार आहे. 

Tags: marathi serialMarathi Serial NewsTula shikvin Changalach Dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
jaya bachchan viral video

'जलसा' बंगल्याबाहेर रात्रीच्या अंधारात एकट्या दिसल्या जया बच्चन, व्हिडीओवर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चाहत्यांनी फटकारले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.