देशात सर्वत्र दिवाळीची धामधूम बघायला मिळत आहे. सगळीकडे रोषणाई दिसून येत आहे. बॉलिवूड कलाकारदेखील दिवाळीच्या पार्टीमध्ये उत्साहाने सहभाग घेताना दिसत आहेत. दिवाळीच्या दिवशी अमिताभ यांची पत्नी जया बच्चन व मुलगी श्वेता नंदा ‘जलसा’ निवासस्थानी लक्ष्मीपूजन करण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्यांचे काही फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहेत. तसेच त्यांच्या व्हिडीओची चर्चादेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत असलेली दिसून आली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जया बच्चन पाठमोऱ्या दिसून येत आहेत. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी जया यांच्यावर निशाणा साधला असून विचित्र प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. (jaya bachchan viral video)
अमिताभ यांच्या पाठोपाठ जया यांचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चांगलीच गर्दी झालेली पाहायला मिळाली. तसेच काही नेटकऱ्यांनी विचित्र प्रतिक्रिया देणाऱ्या नेटकऱ्यांना खडे बोलदेखील सुनावले आहेत.
सोशल मीडियावर कलाकारांचे दिवाळी साजरी करतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जया या काहीही बोलत नाहीत तसेच पापाराजीबरोबर वाददेखील घालताना दिसत नाहीत. असे असतानाही नेटकऱ्यांनी जया यांच्यावर निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “असं वाटत आहे की आता मागे वळून बोलतील ‘आम्ही मंजुलिका’”, तसेच एका नेटकऱ्याने ‘स्त्री’ चित्रपटातील एक एक संवाद लिहिला की, “ओ स्त्री कल आना”.
तसेच जया यांना ट्रोल करणाऱ्यांनादेखील काही नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. काही लोकांनी लिहिले की, “या बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. अमिताभ यांच्यापेक्षाही जया यांचं मोठं नाव होतं. थोडा आदर करा त्यांचा”, तसेच अजून एकाने लिहिले की, “जया यांचा रंग स्वाभाविक आहे. लोकांकडे किती रिकामा वेळ आहे”. तसेच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ऐश्वर्या राय-बच्चनची विचारणा करत विचारले की, “ऐश्वर्या कुठे आहे?”. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल दिसत आहे.