मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अभिनेता चांगलाच लोकप्रिय झाला. या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मात्र काही दिवसांपूर्वी हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन झालं. त्याने स्वत: भावूक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. हार्दिक जोशीने त्याच्या वहिनीबरोबरचे फोटो शेअर करत वाहिनीच्या निधनाबद्दलची माहिती दिली होती. यावेळी हार्दिकने भावुक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. डोळ्यात पाणी यावी, अशी ही पोस्ट पाहून नेटकरही हळहळले होते. (Hardeek Joshi Emotional For Sister-in-Law)
अशातच हार्दिक पुन्हा एकदा त्याच्या वहिनींच्या आठवणीत दु:खी भावना व्यक्त केल्या आहेत. हार्दिकने नुकतीच ‘मज्जा पिंक’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वहिनींच्या आठवणींना उजाळा दिला. हार्दिकची पत्नी व अभिनेत्री अक्षया देवधरने मैत्रीणींसह नुकतंच नाम या नावाच्या साडीचा व्यवसाय सुरु केला असून याच व्यवसायाच्या उद्घाटनाला हार्दिकने वहिनीबद्दलच्या आठवणी ताज्या केल्या.
यावेळी हार्दिक असं म्हणाला की, “आज वहिनीची खूप आठवण येतेय. तिला साड्या खूप आवडायच्या. ती आता असती तर जवळपास १०-१५ साड्या विकत घेतल्या असत्या. तिला साड्यांची खूप आवड होती. खूप आठवण येतेय आता तिची, तिच्याच आशीर्वादामुळे हे सगळं शक्य झालं आहे. नाही तर हे काही शक्य नसतं झालं. तिचा हात कायमच आमच्या डोक्यावर असणार आहे. मला आशा आहे की, आम्ही तिला जे शब्द दिले होते किंवा आम्ही तिला सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पात्र ठरू आणि त्यासाठी आम्ही नक्की शक्य तितके प्रयत्न करत राहू”.
दरम्यान, वहिनीच्या निधनानंतर हार्दिकने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत असं म्हटलं होतं की, “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस. पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. तू सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणून माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम राहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको”.