Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या तूफान चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमधील मैत्रीचं समीकरण आता बदललं आहे. पहिल्या दिवसापासून तयार झालेले ग्रुप आता फुटताना दिसून येत आहेत. या स्पर्धेत निक्की तांबोळी सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक ठरत आहे. अरबाज-निक्की ही जोडी संपूर्ण घराविरोधात लढत देताना दिसत आहे. त्यातच वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल निक्की सतत काही न काही बोलतानाचे पाहायला मिळत आहे. निक्की कॅप्टन वर्षा यांना “मी वॉशरुम स्वच्छ करणार नाही” असं सांगते. यामागे “सूरजने निकष समजून न घेता मला नॉमिनेट केलं. तुम्ही माझ्यासाठी स्टॅण्ड घेतला नाही त्यामुळे मी घरात ड्युटी करणार नाही” असं कारण ती वर्षा यांना देते. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
बुधवारच्या भागात निक्कीने वाद घालताना अगदी परिसीमा गाठली. निक्कीने वर्षा यांच्याबद्दल अपशब्द वापरले. ” मला अडवणारा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही मला हुकूम देऊ नका. कॅप्टन आहात, तर कॅप्टनच राहा. इथे बादशाह नका होऊ. माझा बाप बनू नका. समजलं ना? कॅप्टनच्या हैसियतमध्ये राहा”. तसंच जान्हवीने तिला जेवण न दिल्यामुळेदेखील तिने बोलताना अनेकदा “हे घर कुणाच्या बापाचे नाही” असं म्हटलं. यावर डीपी दादांनी टिचे कान टोचलेच. मात्र आता निक्कीच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनीदेखील तोंडसुख सोडलं आहे. नेटकऱ्यांनी निक्कीबद्दलची त्यांची नाराजी सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे व्यक्त केली आहे.
एका नेटकऱ्याने याबद्दल असं म्हटलं आहे की, “कलर्स मराठीला विनंती आहे. ‘बिग बॉस’ शो चालवत आहेत खुप छान गोष्ट आहे. परंतु यातून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेशी खेळत आहात हे लक्षात ठेवा. कोणाचा आई व बाप काढणे चुकीच आहे. अशा सदस्यांना आपला पाठिंबा दिसुन येत आहे. हा महाराष्ट्रात आहे आणि इथे असले फालतु चाळे चालु दिले जात नाहीत. आपण योग्य तो निर्णय घ्याल हिच अपेक्षा आहे. अन्यथा ‘बिग बॉस’चं घर उध्द्वस्त झाल तर सर्व जबाबदारी तुमचीच राहील”. तसंच एकाने “यावेळी जर नक्कीला भाऊचा धक्का नाही दिला तर हा निक्कीचाच ‘बिग बॉस’ समजेल” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “धक्के देणे, केस ओढणे, बोचकरे घेणे, कपडे फाडने अश्या गोष्टी निक्की नेहमी करते, हा खेळ खेळण्याचा प्रकार नाही. यासाठी तिला शिक्षा झालीच पाहिेजे” असं म्हटलं आहे.

तसंच “निक्की ‘बिग बॉस’ची लाडकी आहे का?? ती कोणाच्याही बापावर जाते, कॅपटनचं ऐकत नाही, नियम मोडते, तरीही तिच्यासाठी स्पेशल चहा का?”, “यावेळेस नक्की जर घराबाहेर निघली नाही तर समजून जा हा बिग बॉस केवळ नक्कीच आहे मराठी प्रेक्षकांची नावे घेऊन सर्व मराठी माणसांना कलर्स मराठी फसवत आहे”, “खरचं कोणाच्या आई बापा वरून जाणे चुकीचे आहे…हे असं चालू राहिले तर त्या मध्ये कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठीचे नाव खराब होतेच. पण त्याबरोबरच मराठी संस्कृती पण खालावलेली दिसते” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व राग व्यक्त केला आहे.