गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“याक्षणी तिची खूप आठवण येते आणि…”, वहिनीच्या निधनाबाबत बोलताना हार्दिक जोशी भावुक, म्हणाला, “तिला जे शब्द दिले…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 5, 2024 | 5:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hardeek Joshi shared his emotional feelings about his deceased sister-in-law.

वहिनीच्या निधनाबाबत बोलताना हार्दिक जोशी भावुक, म्हणाला, “याक्षणी तिची खूप आठवण येते”

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अभिनेता चांगलाच लोकप्रिय झाला. या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मात्र काही दिवसांपूर्वी हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन झालं. त्याने स्वत: भावूक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. हार्दिक जोशीने त्याच्या वहिनीबरोबरचे फोटो शेअर करत वाहिनीच्या निधनाबद्दलची माहिती दिली होती. यावेळी हार्दिकने भावुक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. डोळ्यात पाणी यावी, अशी ही पोस्ट पाहून नेटकरही हळहळले होते. (Hardeek Joshi Emotional For Sister-in-Law)

अशातच हार्दिक पुन्हा एकदा त्याच्या वहिनींच्या आठवणीत दु:खी भावना व्यक्त केल्या आहेत. हार्दिकने नुकतीच ‘मज्जा पिंक’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वहिनींच्या आठवणींना उजाळा दिला. हार्दिकची पत्नी व अभिनेत्री अक्षया देवधरने मैत्रीणींसह नुकतंच नाम या नावाच्या साडीचा व्यवसाय सुरु केला असून याच व्यवसायाच्या उद्घाटनाला हार्दिकने वहिनीबद्दलच्या आठवणी ताज्या केल्या.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “निक्की ‘बिग बॉस’ची लाडकी आहे का?”, निक्कीची आरेरावी पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “तिला शिक्षा द्या नाहीतर…”

यावेळी हार्दिक असं म्हणाला की, “आज वहिनीची खूप आठवण येतेय. तिला साड्या खूप आवडायच्या. ती आता असती तर जवळपास १०-१५ साड्या विकत घेतल्या असत्या. तिला साड्यांची खूप आवड होती. खूप आठवण येतेय आता तिची, तिच्याच आशीर्वादामुळे हे सगळं शक्य झालं आहे. नाही तर हे काही शक्य नसतं झालं. तिचा हात कायमच आमच्या डोक्यावर असणार आहे. मला आशा आहे की, आम्ही तिला जे शब्द दिले होते किंवा आम्ही तिला सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पात्र ठरू आणि त्यासाठी आम्ही नक्की शक्य तितके प्रयत्न करत राहू”.

आणखी वाचा – हेमंत ढोमेच्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, स्वतःच्याच गावात शूट केला चित्रपट, म्हणाला, “आपल्या भागातले लोक…”

दरम्यान, वहिनीच्या निधनानंतर हार्दिकने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत असं म्हटलं होतं की, “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस. पण तुझं अस्तित्व आमच्यात कायम राहील. तू सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणून माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम राहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको”.

Tags: hardeek joshiHardeek Joshi Sister-in-law Emotional Newsmarathi actor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
jaya bachchan realtion with father in law

सासू-सासऱ्यांबरोबरही गैरवर्तन करायच्या जया बच्चन, अमिताभ बच्चन यांच्यासमोरही ओरडायच्या अन्…; असं काय घडलेलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.