मराठी मालिकाविश्वातील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणून अक्षया देवधर व हार्दिक जोशी यांना ओळखतात. छोटया पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून अक्षया व हार्दिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. दोघांची रील लाईफ केमिस्ट्री जितकी आवडली होती, तितकीच ती रिअल लाईफ सुद्धा अनेकांना भावली होती. मालिका संपल्यानंतर प्रेक्षक या जोडीला मिस करत होते. पण जेव्हा दोघांनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला होता. (Akshaya Deodhar post on Hardeek Joshi’s Birthday)
प्रेक्षकांची ही लाडकी जोडी काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली असून दोघंही लग्नानंतरचा प्रत्येक क्षण साजरा करत आहेत. हार्दिक व अक्षया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ते त्यांचे फोटो व व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांसह शेअर करतात. अशीच एक पोस्ट नुकतीच अक्षयाने केली, जी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
अभिनेता हार्दिक जोशी आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींसह चाहते हार्दिकवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. हार्दिकची पत्नी अक्षया देवधरनेही हार्दिकसाठी खास पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हार्दिकबरोबर काही फोटोज शेअर केले. या फोटोजमध्ये मालिकेतील काही सीन्स व वाढदिवसाच्या जुन्या आठवणी तिने शेअर केले आहेत.
हे देखील वाचा – Video : …अन् रस्त्यालगतच्या दुकानात स्वतः भजी तळत राहिला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “गरीब लोकांना…”
या फोटोजसह दिलेल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “गेल्या ७ वर्षांपासून प्रत्येक दिवशी आम्ही एकमेकांना पाहत आलो आहोत. आपण भेटलो त्या पहिल्या दिवशी आणि आजच्या दिवशी केवळ एक फरक आहे, ते म्हणजे आपल्यातील वाढलेले हे प्रेम. सहकलाकार होण्यापासून ते स्नूपीचे सहपालक होण्यापर्यंत, अडखळत हाय हॅलोपासून ते एकमेकांशी मनापासून बोलण्यापर्यंत, आम्ही खूप पुढे आलो आहोत! तुझ्या मिठीत जाग येणे हाच माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल.” असं म्हणत तिने हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकारांनी कमेंट करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – …अन् छेड काढणाऱ्या चार जणांना प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने बेदम मारलं, म्हणाली, “त्या पोरांना…”
‘तुज्यात जीव रंगला’ नंतर हार्दिक अनेक मालिका व चित्रपटांमध्ये झळकला आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत तो सध्या काम करताना दिसतो. त्याचबरोबर त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून ‘वेड मराठे वीर दौडले सात’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर अक्षया लग्नानंतर अभिनय क्षेत्रात फारशी दिसली नाही. पण चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.