मराठी मनोरंजनसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्री त्यांच्या बेधडक अंदाजासाठी व स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री सुरभी भावे. सुरभीने आतापर्यंत बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर तिने ‘पावनखिंड’ व ‘चंद्रमुखी’ सारख्या मराठी चित्रपटही काम केलं आहे. सुरभीने ‘स्वामिनी’ मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरली होती. या मालिकेतून ती बरीच लोकप्रिय झाली. सध्या ती ‘भाग्य दिले तु मला’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सुरभी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिने स्वतःचं युट्युब चॅनलही सुरुवात केले आहे. त्यावरून ती आपल्या कामाच्या तसेच कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींची माहिती देत असते. तसेच समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईक गोष्टींबाबत स्वतःचं मत मांडताना दिसते. नुकतंच तिने एक किस्सा शेअर केला आहे ज्यात तिने चार जणांना चोप दिला असल्याचा खुलासा केला. (Surabhi bhave reveales that she fight with four men)
सुरभी सोशल मीडियासह युट्युबवरही बरीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचं युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. त्यावर ती विविध विषयांवर बोलताना दिसते. तसेच तिला आलेले अनुभव शेअर करताना दिसते. नुकताच तिने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात तिने तिच्या शालेय जीवनातील आठवणी चाहत्यांसह शेअर केल्या.
सुरभी सांगते, “मी मुळची कोकणातली गुहागरची आहे. पहिली ते चौथी माझं शिक्षण गुहागरमध्येच झालं. पण माझ्या आयुष्याला राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेमुळे कलाटणी मिळाली. ही आशिया खंडातील मुलींसाठीची पहिली शाळा आहे. या शाळेच्या पहिल्याच बॅचची मी पासआऊट विद्यर्थीनी आहे”.
याबद्दल ती पुढे सांगते, “त्या शाळेत हॉस्टेलमध्ये राहणं अनिवार्य होतं. तिथे अभ्यासाबरोबर विविध गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जायचं. त्यात स्विमिंग, योगा, रायफल शुटिंग, कराटे अशा प्रकारांचा समावेश होता. त्याशिवाय शाळेत सैनिकी प्रशिक्षणही दिलं जातं होतं. त्यामुळे आजवर माझी छेड काढणाऱ्या चार मुलांना मी हाणलं आहे. याचं सगळं श्रेय या शाळेतील ट्रेनिंगला जातं”, हा किस्सा सांगत तिने आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला आहे. तिने सांगितलेल्या किस्स्याचं व तिने दाखवलेल्या हिंमतीचं नेटकरी कमेंट करत कौतुक करत आहे.