मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् रस्त्यालगतच्या दुकानात स्वतः भजी तळत राहिला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “गरीब लोकांना…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 6, 2023 | 5:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sandeep Pathak makes Bhaji

Video : ...अन् रस्त्यालगतच्या दुकानात स्वतः भजी तळत राहिला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “गरीब लोकांना...”

निखळ विनोद निर्मिती व संवेदनशील अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते संदीप पाठक यांची मोठी फॅन फॉलोविंग आहे. एका छोट्याश्या गावातून आलेल्या संदीप यांनी अनेक दर्जेदार कलाकृतींमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर ते अनेकदा आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा जपताना दिसतात. त्यांच्या नाटकाच्या दौऱ्यावेळी ते विविध लोकांशी संवाद साधतात, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. शिवाय, विविध उपक्रम राबवत ते तळागाळातील लोकांशी घट्ट नाळ जोडतात. संदीप यांचा असाच एक व्हिडिओ समोर आला, ज्याची सध्या चर्चा होत आहे. (Sandeep Pathak makes Bhaji)

संदीप पाठक यांचं रंगभूमीवर ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे एकपात्री नाटक सुरु आहे. या नाटकाच्या निमित्ताने राज्यातील विविध ठिकाणी व खेड्यापाड्यात ते नेहमीच जात असतात. याच प्रवासादरम्यान संदीप हे कळंबजवळील एका दुकानात थांबले. तेव्हा तिथे एक युवक भजी बनवताना दिसला. हे बघून त्यांना भजी तळण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी स्वतःच्या हाताने भजी तळत त्यांनी याचा आस्वाद घेतला.

हे देखील वाचा – “आपली लायकी काय?”, ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर नवऱ्याने केला डान्स, ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या ऐश्वर्या नारकर

संदीप यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यामध्ये ते भजी तळताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना ते म्हणाले, “प्रवासात मला प्रत्येक ठिकाणी थांबून वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. सुरडी फाटी (कळंब) जवळ आकाश नावाचा मुलगा गरम गरम भजे तळत होता, मला मोह झाला भजे तळण्याचा आणि खाण्याचा. धन्यवाद आकाश.” त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला असून कमेंटद्वारे ते संदीपचे कौतुक करताना दिसत आहे. एक नेटकरी म्हणाला, “व्हिडिओ पाहून अस समजलं की, संदीप पाठक हा सेलिब्रिटी असूनसुद्धा गरीब लोकांना सपोर्ट करतो” तर आणखी एक नेटकरी यावर म्हणाला, “तुम्ही मनाने खूप छान आहात. एवढे मोठे नट असूनही तुम्ही त्यांची विचारपूस करता. तुम्हाला देव कधी काही कमी पडू देणार नाही.”

हे देखील वाचा – सेटवर दोन तास रिकामी मिळालेल्या वेळेमध्ये जुई गडकरी काय करते?, स्वतःच व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

View this post on Instagram

A post shared by Sandeep Pathak (@mesandeeppathak)

अभिनेते संदीप पाठक हे गेली अनेक वर्ष नाटकाच्या निमित्ताने देश-विदेशात दौरे करताना दिसतात. त्याचबरोबर अनेक चित्रपट, मालिका व विनोदी कार्यक्रमांमधील त्यांच्या अभिनयाचे नेहमी कौतुक होत आले आहे. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून त्याद्वारे ते विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडत असतात.

Tags: marathi nataksandeep pathakSandeep Pathak makes Bhaji
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Surabhi bhave reveales that she fight with four men

…अन् छेड काढणाऱ्या चार जणांना प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने बेदम मारलं, म्हणाली, “त्या पोरांना…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.