शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने नाशिकमध्ये बांधलं स्वतःचं अलिशान घर, प्रत्येक वस्तू आहे खास, Inside Video व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 25, 2024 | 9:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Thipkyanchi rangoli serial fame actor Chetan Vadanere took a new house in Nashik and he shared a special glimpse of on social media

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने नाशिकमध्ये बांधलं स्वतःचं अलिशान घर, प्रत्येक वस्तू आहे खास, Inside Video व्हायरल

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीतच पसंतीस उतरली होती. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ठिपक्यांच्या रांगोळी या मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि अभिनेता चेतन वडनेरे ही जोडी लोकप्रिय झाली. आता या मालिकेतील शशांक म्हणजे चेतनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. चेतनने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री ऋजूता धारापबरोबर लग्न केल्यानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. अशातच त्याच्या नुकत्याच एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

चेतनने त्याच्या मूळगावी म्हणजेच नाशिकमध्ये नवीन घर घेतलं असून या नवीन घराची खास झलक त्याने या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याचे नवीन घर आकार घेत असल्यापासून ते घर पूर्ण झाल्याची खास झलक दाखवली आहे. अतिशय भव्य व आकर्षक असं त्याचं हे घर असून घरातील सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उत्तम रंगसंगती, उत्तम सजावटीच्या वस्तू तसेच अनेक  आकर्षक फोटोंनी चेतनने आपले नवीन घर सजवलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Chetan D Vadnere (@chetan_vadnere)

आणखी वाचा – शाहरुख खानच्या नावाने तयार करण्यात आली सोन्याची नाणी, ‘तो’ रेकॉर्ड मोडणारा ठरला पहिला बॉलिवूड अभिनेता, सर्वत्र कौतुक

चेतनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याच्या नवीन घराचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. “घर हे माझे आनंदाचे” असं म्हणत चेतनने हा व्हिडीओ शेअर केला असून चेतनने नाशिकमध्ये हे नवीन घर घेतल्याचेदेखील सांगितले आहे. दोन बेडरुम्स व भव्य हॉल असलेलं हे चेतनचं नवीन घर साऱ्यांच्याच पसंतीस पडलं आहे. तसेच हॉलमध्ये असलेली विठ्ठलाची मूर्तीदेखील या घराला घरपण देत आहे. तसेच चेतनच्या घरातील लाईट्सदेखील या घराला शोभा आणत आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट, बोल्ड लूकची तुफान चर्चा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

दरम्यान, एप्रिल महिन्यात चेतनने त्याची प्रियसी ऋजूताबरोबर विवाहगाठ बांधली. त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच त्याने नवीन घर खरेदी केलं आहे. त्याच्या या नवीन घरानिमित्त त्याला अनेक चाहते व कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन, खूप छान घर आहे, नवीन घरानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्याचे कौतुक केलं आहे.

Tags: Chetan VadanereChetan Vadnere New HouseChetan Vadnere New House News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Vivek Agnihotri Angry Post

Video : रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल, सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक भडकला, व्हिडीओ शेअर करत दाखवली सत्य परिस्थिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.