मनोरंजन विश्वातील अभिनेत्री कायमच ट्रेंडिग फॅशन आत्मसात करताना दिसतात. अभिनेत्रींना नव्या ढंगात आणि नव्या रुपात प्रेक्षकांसमोर यायला त्यांना नेहमीच आवडतं. बॉलिवूड असो किंवा मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी, त्यांना हेअर स्टाइल, फॅशन, दागिने यावर नवनवीन प्रयोग करायला प्रचंड आवडतं. असाच एक प्रयोग मराठी मालिका आणि सिनेविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने केला आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. आपला स्टायलिश अंदाज, अभिनय व हटके नृत्यकौशल्य यामुळे चर्चेत राहणारी संस्कृती गेल्या काही दिवसांपासून तिच्या विविध लूकमुळे चांगलीच चर्चेत आहे.
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलं असून सोशल मीडियावर सध्या या फोटोशूटची बरीच चर्चा रंगली आहे. संस्कृतीच्याने टॉपलेस फोटोशूट केलं असून सध्या सोशल मीडियावर तिच्या नवीन फोटोशूटची प्रचंड चर्चा सुरू आहे. संस्कृतीने शॉर्ट हेअरकट, निळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांनी शरीर झाकलेले शरीर असा लूक केला आहे. या हटके फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचे हे नवीन फोटोशूट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
संस्कृतीच्या या ‘हटके’ फोटोंना चाहत्यांसह अनेक कलाकारांनी लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती दर्शवली आहे. चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनीदेखील अभिनेत्रीच्या या नवीन फोटोंना लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. संस्कृतीने भूमिकेची गरज म्हणून तिच्या लूकमध्ये बदल केला आहे. एका भूमिकेसाठी तिनं तिचे लांबसडक केस कापले असून तिच्या नवीन हेअर कटची बरीच चर्चा झाली. अशातच आता तिचं हे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.
दरम्यान, संस्कृतीने ‘सांगते ऐका’, ‘शॉटकट’, ‘एफयू’, ‘चौक’सारख्या अनेक मराठी चित्रपटांत काम केले असून तिने काही गाजलेल्या मालिकांमध्येही काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आपल्या नवनवीन लूकमुळे चर्चेत असलेली संसृती आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.