‘बॉलिवूडचा किंग’ म्हणून आपले एक बिरुद घेऊन मिरवणारा अभिनेती म्हणजे शाहरुख खान. शाहरुखचे केवळ देशातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. नाव, पैसा, प्रसिद्धी यासह त्याने अमाप लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेता शाहरुख खान हा भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीनेही सन्मानित आहे. शाहरुख खानचा आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. अशातच आता त्याच्या नावे नुकतीच एक नवीन कामगिरी नोंदणवण्यात आली आहे आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील प्रसिद्ध ग्रेविन म्युझियममध्ये शाहरुखच्या नावाचे सोन्याचे नाणे आहे, ज्यावर शाहरुखचा फोटो आणि नावही छापलेले आहे. हे नाणे २०१८ मध्ये आले होते, परंतु एका चाहत्याने नुकताच या नाण्याचा फोटो शेअर केला होता, जो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यामुळे आता किंग खानचे अनेक चाहत्यांचा ऊर अभिमानाने भरुन आला आहे. मात्र हा सन्मान आताचा नसून सहा वर्षांपूर्वीची आहे.
शाहरुख खानच्या अनेक चाहत्यांना असे वाटते की पॅरिसमधील ग्रेविन म्युझियममध्ये त्याच्या नावाने सोन्याचे नाणे जारी करण्यात आले आहे, जिथे शाहरुखचा मेणाचा पुतळादेखील आहे, परंतु हे खरे नाही. २०१८मध्येच शाहरुखला हा सन्मान देण्यात आला होता. तेव्हा अभिनेत्याच्या चाहत्याने नाण्याचा फोटोही ट्विटरवर शेअर केला होता. मात्र आता या नाण्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नुकतीच ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शाहरुखच्या सोन्याच्या सोन्याच्या पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती. तेव्हापासून शाहरुखबद्दलच्या अनेक चर्चा होत आहेत.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट, बोल्ड लूकची तुफान चर्चा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
दरम्यान, शाहरुखने त्याच्या आजवरच्या कारकीर्दीत अनेक हीट चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. शाहरुखच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख लवकरच ‘किंग’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्याबरोबर त्याची मुलगी सुहाना खानदेखील आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन हादेखील यात दिसणार आहे अर्थात याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.