स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीतच पसंतीस उतरली होती. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ठिपक्यांच्या रांगोळी या मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि अभिनेता चेतन वडनेरे ही जोडी लोकप्रिय झाली. आता या मालिकेतील शशांक म्हणजे चेतनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. चेतनने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री ऋजूता धारापबरोबर लग्न केल्यानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. अशातच त्याच्या नुकत्याच एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
चेतनने त्याच्या मूळगावी म्हणजेच नाशिकमध्ये नवीन घर घेतलं असून या नवीन घराची खास झलक त्याने या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याचे नवीन घर आकार घेत असल्यापासून ते घर पूर्ण झाल्याची खास झलक दाखवली आहे. अतिशय भव्य व आकर्षक असं त्याचं हे घर असून घरातील सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उत्तम रंगसंगती, उत्तम सजावटीच्या वस्तू तसेच अनेक आकर्षक फोटोंनी चेतनने आपले नवीन घर सजवलं आहे.
चेतनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याच्या नवीन घराचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. “घर हे माझे आनंदाचे” असं म्हणत चेतनने हा व्हिडीओ शेअर केला असून चेतनने नाशिकमध्ये हे नवीन घर घेतल्याचेदेखील सांगितले आहे. दोन बेडरुम्स व भव्य हॉल असलेलं हे चेतनचं नवीन घर साऱ्यांच्याच पसंतीस पडलं आहे. तसेच हॉलमध्ये असलेली विठ्ठलाची मूर्तीदेखील या घराला घरपण देत आहे. तसेच चेतनच्या घरातील लाईट्सदेखील या घराला शोभा आणत आहेत.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट, बोल्ड लूकची तुफान चर्चा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
दरम्यान, एप्रिल महिन्यात चेतनने त्याची प्रियसी ऋजूताबरोबर विवाहगाठ बांधली. त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच त्याने नवीन घर खरेदी केलं आहे. त्याच्या या नवीन घरानिमित्त त्याला अनेक चाहते व कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन, खूप छान घर आहे, नवीन घरानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्याचे कौतुक केलं आहे.